मुंबईतील Best 7 खाऊ गल्ली! एकदा गेलात की पुढची फेरी ठरलेलीच
- Published by:Isha Jagtap
- Reported by:Priyanka Jagtap
Last Updated:
मुंबई हे स्वप्नांचं शहर म्हणून जगभरात ओळखलं जातं. उरात प्रचंड स्वप्न घेऊन आलेली व्यक्ती इथं 5 रुपयांतही पोट भरून झोपू शकते असं म्हणतात. मुंबईत विविध उत्तम चवीचे रेस्टॉरंट्स, ढाबे आणि फूड स्ट्रीट्स आहेत. अनेक भागात अत्यंत कमी किंमतीत उत्तम दर्जाचे खाद्यपदार्थ मिळतात. मुंबईत सर्वोत्तम स्ट्रीट फूड जिथं मिळतात, अशा 7 खाऊ गल्लींबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. (प्रियंका जगताप, प्रतिनिधी / मुंबई)
घाटकोपर खाऊ गल्ली : घाटकोपर पूर्वेला असलेली ही खाऊ गल्ली उत्कृष्ट चवीच्या शाकाहारी पदार्थांसाठी ओळखली जाते. इथं जिनी डोसा, मंचुरियन डोसा, चीज बर्स्ट डोसा, नूडल डोसा, मसाला डोसा, आयलँड डोसा आणि आइस्क्रीम डोसासह 45 हून अधिक डोसा मिळतात. तसंच याठिकाणी पाणीपुरी, दाबेली, फाफडा, जिलेबी, कबाब, ब्रेड सँडविच, पनीर शेझवान फ्रँकी, पिझ्झा शॉट्स, इत्यादी विविध पदार्थ पाहूनच तोंडाला पाणी सुटतं.
advertisement
कार्टर रोड खाऊ गल्ली : समुद्रकिनारी थंडगार वातावरणात बसून गरमागरम पदार्थांचा आस्वाद घेणं हेच कार्टर रोड खाऊ गल्लीचं वैशिष्ट्य. वांद्रे प्रोमेनेडजवळ असलेल्या या फूड स्ट्रीटवर दर्जेदार फूड स्टॉल्स आहेत. इथं रोल्स, मोमोज, शावरमा, फलाफल, कबाब, इत्यादी खाद्यपदार्थांचे भरपूर पर्याय मिळतात. गुलाब जामुन, फ्रोझन योगर्ट, वेफल्स, इत्यादी गोड पदार्थही इथं असतात.
advertisement
माहिम खाऊ गल्ली : माहिम दर्ग्याजवळ असलेलं हे लोकप्रिय स्ट्रीट फूड डेस्टिनेशन. सर्वोत्तम मांसाहारी पदार्थांसाठी ते ओळखलं जातं. कॉलेजचे विद्यार्थी, ऑफिसला जाणारे लोक आणि पर्यटकांनी ही गल्ली खचाखच भरलेली असते. खिचडा, खिरी, बैदा रोटी, चिकन तंदूरी, मोमोज, रगडा चाट, ड्राय कुल्फी फालुदा आणि आईस्क्रीम फालुदाला इथं विशेष मागणी असते.
advertisement
advertisement
मोहम्मद अली रोड खाऊ गल्ली : मुंबईतील सर्वोत्तम मांसाहारी स्ट्रीट फूडचा आस्वाद घेण्यासाठी हे ठिकाण प्रचंड लोकप्रिय आहे. शावरमा, मसालेदार टिक्का आणि कबाबपासून ते मऊ नान, फिरनी आणि मालपुआपर्यंत इथं वेगवेगळे पदार्थ मिळतात. मिनारा मशिदीच्या शेजारी असलेलं हे फूड स्ट्रीट रमजान काळात खवय्यांनी अक्षरश: खचाखच भरलेलं असतं. इतकंच काय नल्ली निहारी आणि हलीमसारखे लोकप्रिय पदार्थ देणाऱ्या इथल्या रेस्टॉरंटमध्ये बॉलिवूड स्टार्सही वारंवार येतात.
advertisement
खारघर खाऊ गल्ली : उत्सव चौकाजवळ असलेली ही खाऊ गल्ली ऑफिस आणि कॉलेजला जाणाऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. इथल्या भोजनालयांमध्ये फ्राइड राइस, नूडल्स, मंचुरियन, वडापाव, डोसा, लिट्टी चोखा, शावरमा आणि मोमोज यांसारखे विविध स्वादिष्ट पदार्थ मिळतात. तसंच फ्राइड मोमोज, शेझवान मोमोज, चिकन मोमोज आणि मोमो चाटही इथं लोकप्रिय आहेत.
advertisement
SNDT ते क्रॉस मैदान खाऊ गल्ली : SNDT हे मुंबईतील प्रसिद्ध कॉलेज आहे. तिथून ते क्रॉस मैदानापर्यंत असलेली खाऊ गल्लीसुद्धा लोकप्रिय आहे. इथल्या फास्ट फूड आणि चाटला विशेष मागणी असते. इथं पावभाजी, आलू चाट, चायनीज मंचुरियन, कॉर्न कॉब, मिल्कशेक, फ्रुट ज्यूस, बॉम्बे सँडविच, व्हेज फ्रँकी, इत्यादी विविध पदार्थ मिळतात.










