पोहे खावे तर इथंच, तर्रीपासून ते सांभार पोह्यांपर्यत मिळतात तब्बल 9 प्रकार PHOTOS

Last Updated:
प्रत्येक शहरात पोहे मिळण्याची काही खास ठिकाणं असतात. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुदामाचे पोहे हे असेच प्रसिद्ध ठिकाण आहे.
1/6
आपल्याकडे सकाळचा नाष्टा असो किंवा मुलगी बघण्याचा कार्यक्रम, यामध्ये एक पदार्थ आवर्जून केला जातो तो म्हणजे कांदेपोहे होय. अनेकांना सकाळचा नाष्टा म्हटलं की गरमागरम कांदा पोहेच आठवतात. प्रत्येक शहरात पोहे मिळण्याची काही खास ठिकाणं असतात.

advertisement
2/6
 मध्ये सुदामाचे पोहे हे असेच प्रसिद्ध ठिकाण आहे. इथं एक दोन नव्हे तर तब्बल 9 प्रकारचे पोहे मिळतात. विशेष म्हणजे इथं पोहे खाण्यासाठी खवय्यांची मोठी गर्दी होत असते.
छत्रपती संभाजीनगरमध्ये सुदामाचे पोहे हे असेच प्रसिद्ध ठिकाण आहे. इथं एक दोन नव्हे तर तब्बल 9 प्रकारचे पोहे मिळतात. विशेष म्हणजे इथं पोहे खाण्यासाठी खवय्यांची मोठी गर्दी होत असते.
advertisement
3/6
छत्रपती संभाजीनगरमध्ये एस बी कॉलेज समोर प्रसिद्ध सुदामाचे पोहे मिळतात. सकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत पोहे विक्री सुरू असते. सुदामाच्या पोह्यांची चव आणि करण्याची पद्धती खूप वेगळी आहे.

4/6
या ठिकाणी कांदेपोहे, तर्री पोहे, दही पोहे, इंदोरी स्टाईल पोहे, दडपे पोहे, मटकी पोहे, कुरकुरे पोहे, कोकणी पोहे, सांभार पोहे असे पोह्यांचे 9 प्रकार मिळतात. अगदी 20 रुपये ते 25 रुपयांत गरमागरम आणि विविध प्रकारचे पोहे मिळत असल्याने या ठिकाणी नेहमीच गर्दी असते.

5/6
पूर्वी शहरात फक्त कांदे पोहे भेटायचे. पण त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला वेगळं काहीतरी द्यायचं होतं. मग आम्ही कांदा पोह्या व्यतिरिक्त इतर पोह्यांचे प्रकार ग्राहकांना देण्याचा विचार केला.

6/6
त्यानुसार पोह्यांचे विविध प्रकार बनवायला लागलो. अतिशय चांगले सामान वापरून आम्ही हे पोहे बनवतो. त्यामुळे ग्राहकांनाही त्याची चव आवडते, असे पोहे विक्रेते राहुल पातूनकर सांगतात.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement