टेलरिंग सोडलं अन् गाठली मुंबई, काका लस्सीवाले कसे झाले सातारचे ब्रँड?
- Published by:News18 Marathi
- Reported by:Shubham Sharad Bodake
Last Updated:
मोठ्या ब्रँडच्या लस्सींसोबतच काही स्थानिक विक्रेत्यांची लस्सीही एक ब्रँड बनते. असंच काहीसं उदाहरण साताऱ्यातील काका लस्सीबाबत आहे.
advertisement
advertisement
साताऱ्यातील शेटे चौक येथील काका लस्सीवाले हे प्रसिद्ध लस्सी विक्रेते म्हणून ओळखले जातात. काका लस्सीवाले राजू शेख यांचा टेलरिंगचा व्यवसाय होता. तेव्हा त्यांच्या सासऱ्यांचा मुंबईत लस्सी विक्रीचा व्यवसाय होता. त्यांची लस्सी मुंबईत प्रसिद्ध असल्याने अनेक कलाकारही त्या ठिकाणी लस्सी पिण्यासाठी येत होते.
advertisement
advertisement
मुंबईतील सासऱ्यांचा लस्सी विक्रीचा व्यवसाय बारा महिने सुरू असायचा. त्यामुळे यातून चांगला नफा मिळायचा. त्यामुळे असेच लस्सी विक्री केंद्र साताऱ्यात सुरू करण्याचा विचार केला. शेटे चौकात लस्सी विक्री सुरू केली. साताऱ्यातील लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक कलाकार आणि मान्यवर लोकही या ठिकाणी आवर्जून लस्सी पिण्यास येतात. त्यामुळे चांगली कमाई होत असल्याचे राजू शेख सांगतात.
advertisement
"आम्हाला आमच्या हाताने बनवलेल्या लस्सीचा अभिमान आहे. त्यामुळे आमचे ग्राहक आम्हाला मोठ्या अभिमानानं काका लस्सी छान आहे असं म्हणतात. म्हणून मी आणि माझी लस्सी फेमस झाली आहे. आम्ही ग्राहकांना संपूर्ण शुद्ध प्रॉडक्टचीच लस्सी देतो. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रिझर्व्हेटिव्ह मिसळत नाही," अशी माहिती राजू शेख यांनी दिली.
advertisement
लस्सीसाठी 12 तास आधी दूध दही बनवायला ठेवलं जातं. त्यात कोणतंही केमिकल वापरलं जात नाही. काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड असे विविध प्रकारचे ड्रायफ्रूट्स टाकून लस्सी ग्राहकांना दिली जाते. त्याचबरोबर प्लेन लस्सी, मलाई लस्सी देखील दिली जाते. या लस्सीमध्ये गुलकंदचां देखील वापर केला जातो, असे शेख सांगतात. (शुभम बोडके, प्रतिनिधी)


