उपवासाला खिचडी आणि फळं खाऊन कंटाळलात? मग हलवा खा! रेसिपी सोपी

Last Updated:
उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी आणि फलाहार केला जातो. आज आपण उपवास स्पेशल हलव्याची सोपी रेसिपी पाहणार आहोत.
1/5
उपवासाला रताळी खातात. याच रताळ्यांचा हा स्वादिष्ट हलवा आहे. तो बनवण्यासाठी रताळ्यांसह तूप, साखर, दूध आणि वेलचीपूड घ्यावी.

advertisement
2/5
हलवा बनवण्यासाठी सर्वात आधी रताळी कुकरमध्ये शिजवून घ्या. पूर्णपणे शिजल्यानंतर जेव्हा रताळी काहीशी थंड होतील तेव्हा कुकरचं झाकण उघडून रताळी एका भांड्यात काढा. आता रताळ्यांवरच्या साली अलगद काढून घ्या.

3/5
साली काढल्यानंतर रताळ्यांचे बारीक काप करा. आता गॅस ऑन करून त्यावर कढई ठेवा. त्यात तूप घाला. तूप पूर्णपणे गरम झाल्यानंतर त्यात रताळ्यांचे काप घालून मिश्रण एकजीव होऊद्या.

4/5
रताळ्यांमध्ये तूप एकजीव होऊन पूर्ण तापल्यानंतर त्यात चवीनुसार साखर आणि दूध घाला. हे मिश्रण व्यवस्थित ढवळून शिजू द्या. आता त्यात वरून आवडीनुसार वेलचीपूड घाला. अशाप्रकारे उपवास स्पेशल रताळ्यांचा हलवा तयार आहे.

5/5
लक्षात घ्या, दूध कमी असायला नको कारण थंड झाल्यानंतर दूध रताळ्यांमध्ये मुरतं, त्यामुळे हलवा कोरडा लागू शकतो. या हलव्यामुळे उपवासाच्या दिवशी पोट भरलेलं आणि शरीर ऊर्जावान राहील.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
View All
advertisement