Dadar Food Guide : महाराष्ट्रीयन थाळी ते सी फूड, चवीचं खायचं तर थेट इथं जायचं, पाहा दादरमध्ये कुठे काय मिळतं

Last Updated:
मुंबई म्हटलं की दादर हा भाग खवय्यांचा कायमचा लाडका. शहरात कुठूनही या, पण पोटात कावळे ओरडायला लागले की लोकांचं पहिलं नाव येतं ते दादरचं.
1/5
मुंबई म्हटलं की दादर हा भाग खवय्यांचा कायमचा लाडका. शहरात कुठूनही या, पण पोटात कावळे ओरडायला लागले की लोकांचं पहिलं नाव येतं ते दादरचं. इथे पारंपरिकतेपासून मॉडर्निटीपर्यंत, इराणी चहापासून ते अस्सल मालवणी जेवणापर्यंत, कॅफेपासून ते गजबजलेल्या स्ट्रीट फूडपर्यंत प्रत्येकासाठी काहीतरी खास आहे. दादरच्या रस्त्यांवर फिरताना तुम्हाला अशी अनेक ठिकाणं भेटतात जी दशकानुदशकं परंपरा जपून आहेत आणि आजही तिथल्या चवीकडे लोक कायम आकर्षित होतात. म्हणूनच आज आपण घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी दादर फूड गाईड दादरमध्ये काय काय खायचं आणि कुठे खायचं याचा मस्त रोडमॅप.

advertisement
2/5
दादर म्हटलं की अगदी पहिली आठवण येते ती इथल्या महाराष्ट्रीयन उपाहारगृहांची. इथल्या अनेक हॉटेल्सनी दशकानुदशकं आपली चव, आपली परंपरा आणि घरगुतीपणा टिकवून ठेवला आहे. खवय्यांची आवडती आणि स्त्रियांची तर खास पसंती असणारी हॉटेल्स म्हणजे आस्वाद उपहारगृह, मामा काणे उपहारगृह, प्रकाश, गंधर्व, चौरंग, हाऊस ऑफ मिसळ, तृप्त, पोटोबा , एकादशी, तांबे उपहारगृह हीच. इथे आपल्याला लुप्त होत चाललेले पण पारंपरिक अस्सल पदार्थ मिळतात पिठलं-भाकरी, डाळिंबाची उसळ, मटकीची उसळ, थालीपीठ, कोथिंबीर वडी, घरगुती सूप, पोळी-भाजी, मिसळ, झुणका, भात-आमटी… एकदम महाराष्ट्राच्या चवीची सफर! दादरमधील ही जुनी हॉटेल्स आजही खवय्यांसाठी घरगुती चवीची आठवण ताजी करून ठेवतात.

3/5
महाराष्ट्रीयन झालं, तर मग अस्सल मालवणी म्हणजेच सी फूडची चव कशी राहील? दादरमध्ये सीफूडसाठी अगदी पोटभर खाण्यासाठी ज्या ठिकाणी लोक कायम जातात ती ठिकाणं म्हणजे चैतन्य, मासोळी लंच होम, फिश करी राईस, सारंग, मल्हार, मेझवानी, आचरेकर, मालवण कट्टा, कोस्ट अँड ब्लूम.इथे तुम्हाला सुरमई फ्राय, बोंबील रवा फ्राय, कोळंबी फ्राय, चिकन सुक्का, मटण सारखा मसालेदार घास, आणि त्यासोबतच खास गावरान तांदळाची व ज्वारीची भाकरी मिळते. त्यावर कडी म्हणून सोलकढी एकदम अस्सल मालवणी स्टाईल. दादरमधील मालवणी फूड ठिकाणं दशकानुदशकं खवय्यांना सीफूडची खरी चव अनुभवायला लावतात.

4/5
दादरमध्ये आधुनिक, स्वच्छ आणि चांगल्या वातावरणातील कॅफे–रेस्टॉरंट्सही मोठ्या प्रमाणात आहेत. मित्रांसोबत भेट असो किंवा काही हलकंफुलकं खायचं असेल तर इथली अनेक ठिकाणं पर्याय म्हणून समोर येतात. यातील लोकप्रिय नावं म्हणजे कॅफे 792, DP’s (1969 पासून), जिथे साउथ इंडियन पदार्थ, चहा आणि पाणीपुरी यासाठी नेहमीच गर्दी असते. त्यानंतर कॉटेज ग्रिल,बरिस्ता, दादर सोशल, ब्लू हाऊस कॅफे, ओव्हन फ्रेश, जिप्सी कॉर्नर ही रेस्टॉरंट्स चवीसोबत उत्तम क्वालिटी राखून आहेत. सॅंडविचेस, पास्ता, गरमागरम स्नॅक्स आणि पेयांचे अनेक पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहेत.

5/5
दादरचं स्ट्रीट फूड हे कायमच लोकप्रिय राहिलं आहे. इथे अनेक वर्षांपासून सुरू असलेले स्टॉल्स त्यांच्या सातत्यपूर्ण चवीमुळे आजही लोकांना आकर्षित करतात. रोजचा प्रवास असो किंवा खास दादरला भेट देऊन काहीतरी चांगलं खायचं असो, लांबून लांबून लोक इथल्या सुप्रसिद्ध स्टॉल्सवर येतात. कैलास लस्सी, श्रीकृष्ण बटाटेवडा, देवास मोमो हार्ट, अशोक वडापाव, रेणुका ज्यूस सेंटर, रेवाज किचन, टिप्स फ्रँकी, कार्टर्स ब्ल्यू, प्रणव्स कॉर्नर ही ठिकाणं दादरमधील सर्वाधिक भेट दिली जाणारी आहेत.

Kolhapur News: खेळताना घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन् काळानं गाठलं, १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

View All
advertisement