Health Tips : टोमॅटोच्या हा भाग म्हणजे जणू विषच! जास्त खात असाल तर व्हाल 'या' आजाराचे रुग्ण..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
आपल्या रोजच्या आहारात टोमॅटोचा समावेश असतोच. भाजीमध्ये, सॅलडमध्ये टोमॅटो वारले जाते. बऱ्याच लोकांना टोमॅटो खायला खूप आवडतात. हे पौष्टिक घटकांनी समृद्ध फळ आहे. पण हेच पौष्टिक टोमॅटो आपल्यासाठी कधी कधी विषासारखे घातक ठरू शकतात. होय, टोमॅटोमधील काही भाग जास्त प्रमाणात खाल्ल्यास आपल्याला आजाराला सामोरे जावे लागू शकते.
advertisement
आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. वारा लक्ष्मी यांच्या मते, टोमॅटो, वांगी हे नाइटशेड कुटुंबाचा भाग आहेत. त्यात एट्रोपा बेलाडोनासारखे शक्तिशाली विष देखील आहे. टोमॅटोसारख्या नाईटशेड <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/magic-gravy-recipe-make-this-special-gravy-once-and-make-more-than-50-dishes-in-few-minutes-mhpj-1168701.html">भाज्यांमध्ये</a> लायकोपीन आणि इतर पोषक घटक आढळतात. त्यामध्ये सोलॅनिन किंवा टोमॅटिनसारखे अल्कलॉइड असतात.
advertisement
advertisement
इतकेच नाही, तर <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/summer-food-storage-tips-how-to-store-tomatoes-without-refrigerator-tomato-storing-tips-in-summer-mhpj-1177913.html">टोमॅटोच्या</a> बियांमध्ये लेक्टिन नावाचे प्रोटीन असते, जे इतर पोषक घटकांना चिकटून राहते आणि सेल्युलर डिसफंक्शनला कारणीभूत ठरते. लेक्टिन्स तुमच्या आतड्याला त्रास देऊ शकतात आणि यामुळे तुम्हाला आम्लपित्त होऊ शकते.
advertisement
advertisement
तुम्हाला संधिवात किंवा इतर कोणताही स्वयंप्रतिकार रोग असल्यास, या भाज्यांचे जास्त सेवन करण्यापूर्वी काळजी घ्या. कारण हे जळजळ आणि वेदना वाढवतात. (इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)


