तोंड उघडताच येतो वास? दुसऱ्यांचा त्रास कमी करा, मुखवास नाही 'हे' खा!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
आपण खूप वेळ गप्प बसलो, पाणीही प्यायलो नाही तर हळूहळू तोंडातून दुर्गंधी यायला सुरूवात होते. अशावेळी आपण चूळ भरतो किंवा पटकन वेलची वगैरे तोंडात टाकतो. हा झाला तात्पुरता उपाय. परंतु काहीजणांच्या तोंडाचा मात्र सतत घाण वास येत असतो. इतका की त्यांच्या समोरची व्यक्ती नाकावर रुमाल घेऊन बसते. यावरच आज आपण एक रामबाण उपाय पाहणार आहोत.
जेवल्यानंतर अनेकजण पान खातात. या पानात विविध गोड पदार्थ मिसळलेले असतात. परंतु हे नुसतं हिरवंगार पान आरोग्यासाठी प्रचंड फायदेशीर असतं. आयुर्वेदिक डॉक्टर अनिल राय सांगतात की, खायच्या पानामुळे अन्नपचन सुरळीत होतं, पोट निरोगी राहतं. विशेष म्हणजे तोंडाचा वास दूर होतो आणि तोंडाच्या कर्करोगाचा धोकाही कमी होण्यास मदत मिळते. याव्यतिरिक्तसुद्धा या पानाचे अनेक आरोग्यपयोगी फायदे आहेत. जाणून घेऊया.
advertisement
advertisement
advertisement
advertisement









