हृदय आयुष्यभर राहिल सुदृढ! आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश

Last Updated:
अवेळी जेवण, अपूर्ण झोप, व्यायामाचा अभाव यामुळे सध्या आरोग्याबाबतच्या तक्रारी प्रचंड वाढल्या आहेत. पूर्वी साठीत जडणारे आजार आता अगदी विशीत होऊ लागले आहेत. आजकाल तरुणांनाही हार्ट अटॅक येतो. याचं मुख्य कारण असतं अयोग्य आहार. सध्याच्या फास्ट जीवनशैलीत आपण फास्ट फूड भरपूर प्रमाणात खातो. परंतु आहारात काही योग्य बदल करून आपण अगदी निरोगी आयुष्य जगू शकतो. आज आपण हृदयासाठी आवश्यक पदार्थ जाणून घेणार आहोत. (आदित्य आनंद, प्रतिनिधी / गोड्डा)
1/5
आहारतज्ज्ञ सांगतात की, ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, जांभूळ, इत्यादी बेरी फळं हृदयासाठी अत्यंत फायदेशीर असतात. ती नियमित खाल्ल्यास हृदय सुदृढ राहण्यास मदत मिळू शकते. दररोज शक्य नसेल तर आपण आठवड्यातून एकदा ही फळं खाऊ शकता. त्यांमध्ये फायटो न्यूट्रेट्स असतात, ज्यामुळे हृदयाच्या नसा डॅमेज होत नाहीत.

advertisement
2/5
सुदृढ हृदयासाठी दररोज फळांचं सेवन करणं आवश्यक आहे. शक्य असल्यास नाश्त्यात आंबा, द्राक्ष, पपई, सफरचंद, कलिंगड किंवा डाळिंब खाऊ शकता. ही फळं हृदयासह पोटासाठीही फायदेशीर ठरतात. त्यांमुळे आरोग्य उत्तम राहण्यास मदत मिळते.

3/5
डॉ. विवेकानंद यांनी ही माहिती दिली असून ते म्हणाले, हृदयासाठी फळभाज्याही फायदेशीर असतात. या भाज्यांमध्ये असलेलं फायटोकेमिकल हृदयासाठी उपयुक्त असतं. आपण मटर, मसूर डाळ, फरसबी, इत्यादी भाज्यांचा समावेश आहारात करू शकता.

4/5
हृदय सुदृढ ठेवण्यासाठी ड्रायफ्रूट्स उपयुक्त असतात. त्यातून ओमेगा 3 फॅटी ऍसिड मिळतं. शिवाय भोपळ्याच्या बिया, चिया सीड्स आणि आळशीच्या बिया नियमितपणे खाणंही फायदेशीर ठरतं.

5/5
मासे आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात. हृदयासाठी फायदेशीर असलेलं ओमेगा 3 फॅटी ऍसिड माश्यांमधून भरपूर प्रमाणात मिळतं. यामुळे हृदयात नुकसानदायी फॅट तयार होत नाहीत. शिवाय हृदय सुदृढ राहतं. दरम्यान, इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित असली तरी आपण कोणत्याही पदार्थाचं औषधी सेवन करण्यापूर्वी स्वत: डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement