Garlic Health Benefits : रात्री झोपताना लसूण खाल्ल्याचे फायदे आहेत जबरदस्त, या आजारांना चुटकीसरशी करतो गायब
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
लसूण हे आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात वापरले जाते. पण तुमच्या माहितीसाठी, लसूण फक्त चवीसाठीच नाही, तर त्याच्या असंख्य औषधीय गुणधर्मामुळे तुमचं आरोग्य सुधारण्यासाठी खूप फायदेशीर आहे. डॉ. जे. पी. भगत यांच्या मते लसणामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियाल गुणधर्म असतात, जे शरीराच्या पचनसंस्थेसाठी फायदेशीर ठरतात. लसूण पोटाच्या संसर्गापासून बचाव करण्यात मदत करतो आणि पचनक्षमता सुधारतो. यामुळे शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि अनेक आजारांपासून संरक्षण मिळते.
advertisement
लसणामध्ये व्हिटॅमिन C, B6 आणि सेलेनियम यासारखे महत्त्वाचे घटक असतात. हे घटक शरीराच्या रोग प्रतिकारशक्तीला बळकट करतात, ज्यामुळे शरीर अनेक प्रकारच्या संसर्ग आणि रोगांपासून लांब राहते. व्हिटॅमिन C हा शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे, जो पेशींचे संरक्षण करतो. तसेच, व्हिटॅमिन B6 आणि सेलेनियम शरीरातील विविध एंझाइमॅटिक क्रिया सुधारण्यात मदत करतात.
advertisement
advertisement
advertisement