advertisement

हिवाळ्यातला मेकअप कसा असावा? फॉलो करा ‘या’ टिप्स होईल फायदा

Last Updated:
हिवाळ्यात मेकअप करताना इतर ऋतूंच्या तुलनेत विशेष काळजी घ्यावी लागते.
1/5
 हिवाळ्यात मेकअप करताना इतर ऋतूंच्या तुलनेत विशेष काळजी घ्यावी लागते. कारण सर्व केमिकल्स आणि सौंदर्य प्रसाधनांचा चेहऱ्यावरील त्वचेवर परिणाम होत असतो. हिवाळ्यातला मेकअप कसा असावा? हिवाळ्यात मेकअप करताना कोणती काळजी घेणं आवश्यक आहे ? याविषयी <a href="https://news18marathi.com/maharashtra/wardha/">वर्धा</a> येथील ब्युटीशीयन वंदना बुटे यांच्याकडून जाणून घेऊया.
हिवाळ्यात मेकअप करताना इतर ऋतूंच्या तुलनेत विशेष काळजी घ्यावी लागते. कारण सर्व केमिकल्स आणि सौंदर्य प्रसाधनांचा चेहऱ्यावरील त्वचेवर परिणाम होत असतो. हिवाळ्यातला मेकअप कसा असावा? हिवाळ्यात मेकअप करताना कोणती काळजी घेणं आवश्यक आहे ? याविषयी वर्धा येथील ब्युटीशीयन वंदना बुटे यांच्याकडून जाणून घेऊया.
advertisement
2/5
हिवाळ्यात आपली त्वचा कोरडी पडू लागते. त्यामुळे मेकअप करताना काळजी घेणे आवश्यक आहे. कारण कोरड्या त्वचेवर मेकप खुलून दिसत नाही. त्यामुळे आपल्याला त्वचेला मॉइश्चराईज ठेवावं लागणार आहे. मेकअप करताना जर तुमची त्वचा खूपच कोरडी असेल तर सर्वात आधी चेहरा स्वच्छ धुवून त्यावर तज्ज्ञांनी सुचवलेले मॉइश्चरायझर लावावे. त्यानंतरच आपण त्यावर कुठलेही कॉस्मेटिक्स युज करू शकतो आणि मेकअप करू शकतो, असे बुटे सांगतात.

3/5
उदाहरणार्थ एखाद्याला जर पॅन केकचाच मेकअप आवडत असेल तर अशावेळी त्यांनी जास्तीत जास्त मॉइश्चरायझर लावून पॅन केकचा मेकअप करावा. जर तुमचं फाउंडेशन हे लिक्विड असेल आणि मेकअपमध्ये मॉइश्चरायजर असेल तर आधी मॉइश्चरायजर कमी लावावं. अति जास्त त्वचा कोरडी असेल म्हणजे त्वचेवर रेषा किंवा पुरळ दिसत असतील. तर मेकअप बसवण्यासाठी ‘विटामिन ई’च्या कॅप्सूलचा वापर आपण करायला पाहिजे.

4/5
कॉस्मेटिकमध्ये दोन-तीन थेंब ‘विटामिन ई’चे टाकून मग मेकअप करावा. मेकअप चांगला ब्रँडचा असायला पाहिजे ही काळजी घ्यावी. तसेच एखादी ब्रँड जर एखाद्याच्या स्किनला सूट होते पण तुमच्या स्किनला सूट होत नाही. तर तो ब्रँड आपण टाळायला पाहिजे. सोबतच रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावरील मेकअप फेस वॉशने किंवा क्लिंझरने काढून टाकायला पाहिजे. त्यानंतर कोल्ड क्रिम किंवा नाईट क्रीम आणि तेही नसेल तर खोबरेल तेल लावून झोपायला पाहिजे, असं ब्युटीशियन वंदना बुटे सांगतात.

5/5
लवकरच बोचऱ्या थंडीला सुरूवात होणार आहे. थंडीमध्ये त्वचा कोरडी पडणं, काळी पडणं अर्थात त्वचेवर टॅन येणं हे प्रकार सर्रास होतात. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये आपल्या त्वचेची आणि मेकअपची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. त्वचा व्यवस्थित मॉईस्चराईज करणं, तसंच दिवसभर पाणी पिणं, आहाराचं योग्य सेवन करणं याकडे लक्ष पुरवणं गरजेचं आहे, असंही ब्युटीशियन सांगतात.

Gold Rate: 24 तासात सोन्याच्या दरात 'करेक्शन' येणार, बजेटमध्ये मोठा निर्णय होण्याची शक्यता; तज्ज्ञांचा धक्कादायक अंदाज
24 तासात सोन्याच्या दरात 'करेक्शन' येणार, बजेटमध्ये मोठा निर्णय होण्याची शक्यता
  • घरातील सोन्याबाबत उद्या होणार मोठा फैसला

  • एका निर्णयाकडे सर्वांचे डोळे

  • सोन्याच्या दागिन्यांबाबत नवा 'ट्विस्ट'

View All
advertisement