Mental Health: सततच्या ताणतणावामुळे होतोय मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम, या टिप्स करा फॉलो, राहाल निरोगी
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
Mental Health: कामाचा ताण, सोशल मीडियाचा अतिवापर, झोपेचा अभाव आणि असंतुलित जीवनशैली यामुळे मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. परंतु, काही सोप्या घरगुती पद्धतींचा अवलंब केल्यास मानसिक आरोग्य चांगले राखता येते
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मानसिक विश्रांतीसाठी वेळ काढला पाहिजे. ध्यान (Meditation) आणि श्वसनाचे व्यायाम (Breathing Exercises) हे ताण कमी करण्यासाठी उपयुक्त असलेले सर्वात सोपे घरगुती उपाय आहेत. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी 10 ते 15 मिनिटे शांत बसून खोल श्वासनाचे व्यायाम केल्यास मन स्थिर राहते. यासोबत पुस्तक वाचन, लाईट म्युझिक ऐकणे किंवा बागकाम करणे यांसारख्या आवडीनिवडी जोपासल्यास मानसिक शांती मिळते.
advertisement
चांगल्या मानसिक आरोग्यासाठी सोशल इंटरॅक्शन देखील महत्त्वाचं आहे. घरातील सदस्य, मित्र आणि नातेवाईकांशी सकारात्मक संवाद साधणे, मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. समस्यांवर चर्चा करणे, अनुभव शेअर करणे आणि एकमेकांना आधार देणे, इत्याही क्रियांनी मानसिक ताकद वाढते. याउलट जर एकटेपणा वाढला तर नैराश्याचा धोका वाढतो.
advertisement
डिजिटल डिटॉक्स हे मानसिक आरोग्य जपण्याचे आणखी एक प्रभावी साधन आहे. सोशल मीडियाचा वापर मर्यादित करणे, मोबाईल किंवा कॉम्प्युटरसमोर बसण्याचा वेळ कमी करणे आणि इतर उपक्रमांना जास्त वेळ देण्यासारख्या गोष्टींचा अवलंब केल्यास मेंदूवरील अनावश्यक ताण कमी होतो. एकणच काय तर, घरच्या घरी योग्य दिनचर्या, व्यायाम, ध्यान, सामाजिक संवाद आणि डिजिटल डिटॉक्स यांचा अवलंब केल्यास मानसिकदृष्ट्या दीर्घकाळ निरोगी राहता येते.


