'या' चुकांमुळे खराब होते शकते चार्जिंग स्पीड! अनेक तास चार्जिंगला लावुनही होत नाही चार्ज
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
आजकल अनेक फोनमध्ये फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो. या चार्जिंगला मॅक्सिमाइज करण्यासाठी अनेक गोष्टींकडे लक्ष ठेवण्याची गरज आहे. असे न केल्यास तुमचा फोन अनेक तास चार्ज करुनही चार्ज होणार नाही.
advertisement
advertisement
योग्य अ‍ॅडॉप्टर आवश्यक : स्वस्त किमतींच्या आमिषाने बरेच लोक बाजारातून बनावट किंवा कमी दर्जाचे चार्जर खरेदी करतात. हे फोन चार्ज करतात, परंतु ते जास्त वेळ घेतात आणि बॅटरीवर नकारात्मक परिणाम करतात. म्हणून, नेहमी मूळ आणि कंपॅटिबल अ‍ॅडॉप्टर वापरा. तुम्ही एका प्रतिष्ठित ब्रँडचे हाय-वॅटेज चार्जर देखील खरेदी करू शकता, जे चार्जिंगला फास्ट करेल.
advertisement
केबलकडेही लक्ष देणे गरजेचे : तुम्ही एखादी स्वस्त किंवा खराब क्वालिटीची केबल वापरत असाल तरीही चार्जिंग स्लो होईल. तुमच्याजवळ ओरिजनल आणि कंपॅटिबल अडेप्टर आहे, पण केबल बनावट असेल तर फोन अजिबात स्पीडने चार्ज होणार नाही. या व्यतिरिक्त हे देखील लक्षात ठेवा की, लांब केबलने चार्जिंग स्लो होते. लांबीमुळे सिग्नल डिग्रेड होतात. यामुळे नेहमी फोनला एक छोटी आणि हाय-क्वालिटीच्या केबलने चार्ज करा.
advertisement






