आई की वैरीण? पती वेळेत घरी आला नाही, तिनं दीड वर्षाच्या लेकीलाच..., लातूर हादरलं!

Last Updated:

Latur News: तब्बल 30 तास मानसोपचार तज्ज्ञांच्या निगरानीखाली ठेवल्यानंतर मानसिकदृष्ट्या ती तंदुरुस्त असल्याचा दावा करण्यात आला आहे.

आई की वैरीण? पती वेळेत घरी आला नाही, तिनं दीड वर्षाच्या लेकीलाच..., लातूर हादरलं!
आई की वैरीण? पती वेळेत घरी आला नाही, तिनं दीड वर्षाच्या लेकीलाच..., लातूर हादरलं!
लातूर: आई आपल्या मुलासाठी अगदी सर्वस्वही त्यागू शकते. त्यामुळे आई आणि मुलाचं नातं सर्वात पवित्र मानलं जातं. परंतु, लातूरमध्ये आईनं केलेलं कृत्य पाहून आई की वैरीण? अशाच प्रतिक्रिया उमटत आहेत. पती वेळेत घरी न आल्याच्या रागातून पोटच्या लेकीचाच निर्दयी मातेनं जीव घेतला.
लातूरच्या श्यामनगर परिसरातून धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. ज्या हातांनी घास भरवायचा, त्याच हातांनी मृत्यूचे तांडव केले. केवळ पती घरी यायला उशीर झाला, या क्षुल्लक कारणावरून एका मातेने आपल्या पोटच्या दीड वर्षाच्या 'नंदिनी'वर चाकूचे वार करून तिला कायमचे शांत केले. ही घटना केवळ गुन्हा नाही, तर माणुसकीच्या काळजावर झालेला कधीही न भरणारा वार आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी तिला अटक करून मंगळवारी न्यायालयात हजर केले असता तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
advertisement
तब्बल 30 तास मानसोपचार तज्ज्ञांच्या निगरानीखाली ठेवल्यानंतर मानसिकदृष्ट्या ती तंदुरुस्त असल्याचा दावा करण्यात आला आहे. अश्विनी चौगुले असं या निर्दयी मातेचं नाव असून तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
पतीला फोन करूनही...
मूळचे हासेगावचे हे कुटुंब नव्या स्वप्नांसह लातुरात आले होते. वडील विक्रम पोटाची खळगी भरण्यासाठी उसाच्या ट्रॅक्टरवर रात्रभर राबत होते, तर इकडे घरात 'रागाचा' भस्मासुर अश्विनीच्या मनात घर करून बसला होता. 19 जानेवारीची ती सकाळ नंदिनीसाठी अखेरची ठरेल, असे कोणालाच वाटले नव्हते. पतीला फोन करूनही ते घरी न आल्याने निर्दयी अश्विनीने नंदिनीला चाकूने संपवले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
आई की वैरीण? पती वेळेत घरी आला नाही, तिनं दीड वर्षाच्या लेकीलाच..., लातूर हादरलं!
Next Article
advertisement
ZP Election NCP: घड्याळाचा गजर वाजणार, तुतारीचा आवाज बसणार! पुण्यात पवारांकडून जिल्हा परिषदसाठी मोठा डाव...
घड्याळाचा गजर वाजणार, तुतारीचा आवाज बसणार! पुण्यात पवारांकडून जिल्हा परिषदसाठी म
  • आता राज्यात जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.

  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलिनीकरण होणार असल्याची चर्चा जोरात सुरू

  • राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र लढणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले असून

View All
advertisement