रात्री साडेअकराची वेळ; जेवण बनवण्यावरून दोन रूममेटमध्ये जोराचं भांडण, एकानं चाकू काढला अन्... पुणे हादरलं!
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांच्यात जेवण बनवण्याच्या कारणावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात राकेश वर्माने घरातील चाकू काढला अन्..
पुणे : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मोई परिसरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. यात जेवण बनवण्यासारख्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका रूममेटने दुसऱ्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात ५४ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी झाली असून, पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रामनरेश बुद्धिलाल रावत (वय ५४) आणि आरोपी राकेश वर्मा हे दोघेही उत्तर प्रदेशचे रहिवासी असून कामाानिमित्त मोई येथील एका खोलीत एकत्र राहत होते. १६ जानेवारी रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांच्यात जेवण बनवण्याच्या कारणावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात राकेश वर्माने घरातील चाकू काढून रामनरेश यांच्यावर वार केले.
advertisement
या हल्ल्यात रामनरेश रावत गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर तीन दिवसांनी, सोमवारी (१९ जानेवारी) त्यांनी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी राकेश वर्मा याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. मात्र, जेवण बनण्यासारख्या इतक्या क्षुल्लक कारणावरून चाकूने हल्ला केल्याच्या या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.
advertisement
धमकी देत महिलेवर अत्याचार
पुणे शहरातून नुकतीच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका महिलेवर जीवे मारण्याची धमकी देऊन वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची आणि तिचे दागिने बळजबरीने हिसकावून घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी सुमेश शंकर गेंदे (वय ३०, रा. परभणी) याला अटक केली असून, त्याच्या भावावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 21, 2026 9:47 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
रात्री साडेअकराची वेळ; जेवण बनवण्यावरून दोन रूममेटमध्ये जोराचं भांडण, एकानं चाकू काढला अन्... पुणे हादरलं!










