advertisement

Team India : 'ओ शेरा...', फायनलपूर्वी खेळाडूंना दाखवला गेला 'तो' 10 मिनिटांचा व्हिडीओ अन् न्यूझीलंडवर तुटून पडली टीम इंडिया!

Last Updated:

Suryakumar Yadav On analyst 10 minute Video : टीम इंडियाला वर्ल्ड कप फायनलआधी टीमच्या व्हिडिओ अनालिस्टने 10 मिनिटांची एक खास फिल्म तयार केली होती, असं सूर्यकुमार यादवने सांगितलं.

Team India video analyst put to gether 10 minute film
Team India video analyst put to gether 10 minute film
Team India video analyst 10 minute film : सलग दुसऱ्यांदा टीम इंडियाने आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर आता सूर्यकुमार यादवने वर्ल्ड कपच्या काही खास आठवणी जाग्या केल्या आहेत. त्यावेळी सूर्याने बोलताना एक किस्सा सांगितला. एक 10 मिनिटांचा व्हिडीओ टीम इंडियासाठी किती गेमचेंजर ठरला. यावर सूर्याने खास भर दिला. वर्ल्ड कप फायनलपूर्वी टीम इंडियाच्या अनालिस्ट टीमने हा व्हिडीओ तयार केला होता.

10 मिनिटांची एक खास फिल्म

सूर्याने सांगितलं की, टीमच्या व्हिडिओ अनालिस्टने 10 मिनिटांची एक खास फिल्म तयार केली होती. यामध्ये गेल्या 2 वर्षांतील खेळाडूंच्या प्रवासातील सर्व महत्त्वाचे आणि आनंदाचे क्षण गुंफण्यात आले होते, ज्यामुळे खेळाडू पुन्हा एकदा त्या जुन्या आठवणींत रमले. या फिल्ममध्ये वापरण्यात आलेल्या गाण्यांनी खेळाडूंमध्ये एक वेगळाच उत्साह भरला होता. 'बाहुबली' सिनेमातील गाणी आणि अक्षय कुमारच्या 'केसरी' चित्रपटातील 'ओ शेरा' या गाण्यांचा यात समावेश होता. ही गाणी ऐकताना खेळाडूंच्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि प्रत्येक विजयाचा आनंद पुन्हा एकदा ताजा झाला.
advertisement

पडद्यामागील मेहनत फिल्मच्या माध्यमातून समोर

टीममधील प्रत्येक सदस्यासाठी हा भावनिक क्षण होता. मैदानावर गाजवलेले शौर्य आणि पडद्यामागील मेहनत या फिल्मच्या माध्यमातून समोर आली. विजयाच्या या प्रवासात केवळ रन आणि विकेट महत्त्वाच्या नसून, एकमेकांसोबत घालवलेला वेळ आणि एकमेकांना दिलेला आधारही तितकाच मोलाचा असल्याचं यातून अधोरेखित झालं. टीम इंडिया त्यानंतर खचून गेली नाही तर अधिक जोमाने खेळली.
advertisement

तुम्ही 100 बायलॅटरल मॅचेस जिंकल्या असतील तर...

दरम्यान, फायनलपूर्वी गंभीरचं एक वाक्य टीम इंडियाच्या कामी आलं. तुम्ही 100 बायलॅटरल मॅचेस जिंकल्या असतील तर त्याने काहीही फरक पडत नाही. तुम्ही एक वर्ल्ड कप जिंकला तर फरक पडतो, असं गंभीर म्हणाला होता. त्यामुळे टीम इंडियाने न्यूझीलंडला फायनलमध्ये भारी पडू दिलं नाही अन् सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड कपवर नाव कोरलं.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Team India : 'ओ शेरा...', फायनलपूर्वी खेळाडूंना दाखवला गेला 'तो' 10 मिनिटांचा व्हिडीओ अन् न्यूझीलंडवर तुटून पडली टीम इंडिया!
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement