IPL 2026 पूर्वी चेन्नई सुपर किंग्जसाठी गुड न्यूज, महेंद्रसिंग धोनीला अखेर BCCI कडून क्लिन चीट!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Mahendra Singh Dhoni gets clean chit from BCCI : बीसीसीआयचे एथिक्स ऑफिसर जस्टिस अरुण मिश्रा यांनी धोनीच्या विरोधात करण्यात आलेली हितांच्या संघर्षाची तक्रार आता पूर्णपणे फेटाळून लावली आहे.
IPL 2026 Good news for CSK : आयपीएल 2026 ला येत्या 28 मार्चपासून सुरूवात होत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. या सामन्यात कोण जिंकणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना आता चेन्नई सुपर किंग्जसाठी गुड न्यूज समोर आली आहे. भारताचा माजी कॅप्टन महेंद्र सिंह धोनी याला एक खूप मोठा दिलासा मिळाला आहे. बीसीसीआय (BCCI) चे एथिक्स ऑफिसर जस्टिस अरुण मिश्रा यांनी धोनीच्या विरोधात करण्यात आलेली हितांच्या संघर्षाची तक्रार आता पूर्णपणे फेटाळून लावली आहे.
उल्लंघन झाल्याचे ठोस पुरावे नाहीत
महेंद्रसिंग धोनीच्या विरोधात बोर्डाच्या नियमांचे कोणत्याही प्रकारचे उल्लंघन झाल्याचे ठोस पुरावे उपलब्ध नसल्याचे जस्टिस मिश्रा यांनी स्पष्ट केले असून, यामुळे धोनीला या प्रकरणातून पूर्णपणे क्लीन चिट मिळाली आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये ही तक्रार दाखल करण्यात आली होती, ज्यामध्ये धोनी एक ॲक्टिव्ह प्लेयर असतानाही क्रिकेट अकॅडमीचा मालक असल्याचा दावा केला गेला होता.
advertisement
माहिती उघड न केल्याचा ठपका
या दाव्यामुळे बीसीसीआयच्या 'कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट' नियमांच्या कलम 38(4)(ए) आणि 38(4)(पी) चे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच 2018 मध्ये नियम बदलल्यानंतर आवश्यक माहिती उघड न केल्याचा ठपकाही तक्रारदाराने धोनीवर ठेवला होता, ज्यावर आता अंतिम निर्णय आला आहे.
करार 2017 मध्ये झाला होता, तर...
advertisement
जस्टिस मिश्रा यांनी आपल्या ऑर्डरमध्ये नमूद केलं की, धोनीला एका क्रिकेट अकॅडमीचा मालक मानलं जाऊ शकतं, परंतु त्यामागचे तांत्रिक पैलू महत्त्वाचं आहेत. धोनी आणि आरका स्पोर्ट्स यांच्यातील करार 2017 मध्ये झाला होता, तर बीसीसीआयचे संबंधित रेगुलेशन सप्टेंबर 2018 मध्ये लागू झाले. ज्या काळात धोनीने टीम इंडियाचा कॅप्टन किंवा प्लेयर म्हणून प्रतिनिधित्व केले, त्यावेळेस नियमांचा कोणताही भंग झाला नसल्याचे समोर आलं आहे.
advertisement
विशेष वागणूक दिल्याचे पुरावे सापडले नाहीत
दरम्यान, तक्रारदाराच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना एथिक्स ऑफिसरने सांगितलं की, ही तक्रार नियमांच्या रक्षणापेक्षा वैयक्तिक वादातून प्रेरित असल्याचे दिसून येतंय. या प्रकरणात कोणताही पक्षपातीपणा किंवा विशेष वागणूक दिल्याचे पुरावे सापडले नाहीत. धोनीच्या विरोधात ही तक्रार करण्यामागे तक्रारदाराचा वैयक्तिक व्यावसायिक वाद कारणीभूत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे, ज्यामुळे ही केस कमकुवत ठरली अन् थालाला क्लिन चीट मिळाली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 12, 2026 10:25 AM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
IPL 2026 पूर्वी चेन्नई सुपर किंग्जसाठी गुड न्यूज, महेंद्रसिंग धोनीला अखेर BCCI कडून क्लिन चीट!









