advertisement

Thane : संशयाचं भूत अंगात संचारलं; शेतात नेले अन्.....; पतीने जे केलं ते वाचून तुमचाही थरकाप उडेल

Last Updated:

Thane News : ठाणे शहरातून एका हॉटेलमधील वेटरसोबत अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. जिथे जवळच्या व्यक्तीवर विश्वास ठेवून गेल्यानंतर त्याच्यासोबत जे घडलं ते भयंकर होतं.

पत्नीच्या संबंधांच्या संशयातून ठाण्यात वेटरची हत्या
पत्नीच्या संबंधांच्या संशयातून ठाण्यात वेटरची हत्या
ठाणे : पती-पत्नीच्या नात्यात शिरलेल्या संशयाने टोकाचे पाऊल गाठले असून शीळ-डायघर परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घडलेल्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पत्नीचे एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय आल्याने एका वेटरची हत्या करण्यात आलेली आहे. या प्रकरणी शिळ-डायघर पोलिसांनी अवघ्या चार तासांत आरोपीला अटक केली आहे.
मृत व्यक्तीचे नाव प्रकाश बिसा (वय40) असे असून तो उत्तर प्रदेशातील हसनगंज येथील रहिवासी होता. तो नवी मुंबईतील महापे येथे असलेल्या एका स्नॅक्स सेंटरमध्ये वेटर म्हणून काम करत होता.
advertisement
भातशेतीतील मृतदेहाचे गूढ उकलले
साधारण 8 ते 10 मार्चदरम्यान डायघर येथील पिंपरी गावातील एका भातशेतीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. याबाबत हॉटेल मालक जितेंद्र पाटील राहणारा वडवली खुर्द, कल्याण यांनी शिळ-डायघर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली दोन तपास पथके तयार करण्यात आली. पोलिसांनी तपास करत रामराव जाधव (वय 39) याला ताब्यात घेतले जो शिळगाव ठाणे येथे वास्तव्यास आहे.
advertisement
भातशेतीत घेऊन गेला अन्...
चौकशीत जाधव याने कबुली दिली की त्याला आपल्या पत्नीचे प्रकाश बिसा याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्यामुळे त्याने बिसा याला दारू पिण्याचा बहाणा करून पिंपरी गावातील भातशेतीत नेले. तेथे लोखंडी हातोड्याने डोक्यावर वार करून त्याची हत्या केली. पोलिसांनी आरोपीला हत्यारासह अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
Thane : संशयाचं भूत अंगात संचारलं; शेतात नेले अन्.....; पतीने जे केलं ते वाचून तुमचाही थरकाप उडेल
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement