'डॉक्टर, खूप त्रास होतोय'; सुमीत वेदनेनं विव्हळत होता, पण त्यांनी घरी हकललं, 15 मिनिटात मृत्यू, त्या पहाटे पुण्यात काय घडलं?

Last Updated:

सुमीतला प्रचंड वेदना होत होत्या आणि तो भरती करून घेण्याची विनंती करत होता. मात्र, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी "इतर रुग्णांना त्रास देऊ नका, शांतपणे घरी जा, नाहीतर सिक्युरिटी आणि पोलीस बोलावू," अशी धमकी दिली.

सुमीत सोनावणेचा मृत्यू
सुमीत सोनावणेचा मृत्यू
पुणे: औंध जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सुमीत सोनावणे या 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची अत्यंत वेदनादायक घटना नुकतीच समोर आली. "डॉक्टर, मला खूप त्रास होतोय, मला भरती करून घ्या," अशी विनवणी सुमीत वारंवार करत होता. मात्र, तिथल्या डॉक्टरांनी त्याला केवळ पित्ताचा त्रास असल्याचे सांगून घरी पाठवले. घरी पोहोचल्यावर काही मिनिटांतच सुमीतचा मृत्यू झाला. सरकारी रुग्णालयातील ही असंवेदनशीलता एका गरीब कुटुंबाचा आधार हिरावून घेणारी ठरली आहे.
नेमकी घटना काय?
सुमीत सोनावणे (३२) हा वाडिया कॉलेजमध्ये शिपाई म्हणून कार्यरत होता. १८ जानेवारीच्या पहाटे ३:३० च्या सुमारास त्याच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. काही महिन्यांपूर्वीच त्याच्या चुलत भावाचा हृदयविकाराने मृत्यू झाला असल्याने सुमीत घाबरला होता. त्याने आपल्या भावाला उठवले आणि तो औंध जिल्हा रुग्णालयात पोहोचला. तिथे डॉक्टरांनी त्याची 'ईसीजी' चाचणी केली आणि ती 'नॉर्मल' असल्याचे सांगत त्याला पित्ताचे इंजेक्शन देऊन घरी जाण्यास सांगितले.
advertisement
धमकावून घरी पाठवले: सुमीतच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमीतला प्रचंड वेदना होत होत्या आणि तो भरती करून घेण्याची विनंती करत होता. मात्र, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी "इतर रुग्णांना त्रास देऊ नका, शांतपणे घरी जा, नाहीतर सिक्युरिटी आणि पोलीस बोलावू," अशी धमकी दिली. अखेर हतबल होऊन भाऊ त्याला घरी घेऊन आला. घरी आल्यावर वॉशरूममधून बाहेर पडताच सुमीतला दोनदा जोरात खोकला आला आणि तो जमिनीवर कोसळला. त्याला पुन्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला 'मृत' घोषित केले.
advertisement
सुमीतच्या पश्चात त्याची वृद्ध आई आणि मोठा भाऊ विवेक आहे. सुमीतने स्वतःला फिट ठेवण्यासाठी अवघ्या १८ दिवसांपूर्वीच जिम जॉइन केली होती. "आमच्याकडे पैसे असते, तर आम्ही मोठ्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेलो असतो आणि आमचा भाऊ वाचला असता," अशी भावना सुमीतच्या काकांनी दीपक यांनी व्यक्त केली.
औंध जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ यम्पल्ले यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती नेमली आहे. ही समिती त्या रात्री ड्युटीवर असलेले डॉक्टर, नर्स आणि सुरक्षा रक्षकांचे जबाब नोंदवणार आहे. सुमीतचा ईसीजी रिपोर्ट आणि त्याला दिलेली औषधे यांची पुन्हा पडताळणी केली जाईल.तसंच सांगवी पोलिसांनी हे प्रकरण ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय मंडळाकडे तपासासाठी पाठवले आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
'डॉक्टर, खूप त्रास होतोय'; सुमीत वेदनेनं विव्हळत होता, पण त्यांनी घरी हकललं, 15 मिनिटात मृत्यू, त्या पहाटे पुण्यात काय घडलं?
Next Article
advertisement
Gold Silver Price: अमेरिकेची धमकी, चीननं खेळ बिघडवला, सोनं-चांदीच्या बाजारात हाहाकार, ४८ तासांत २५ हजारांची उसळी
अमेरिकेची धमकी चीननं खेळ बिघडवला, सोनं-चांदीच्या बाजारात हाहाकार, ४८ तासांत २५ ह
  • जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत सराफा बाजारात सध्या ऐतिहासिक तेजी

  • गेल्या दोन दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरांनी सर्व विक्रम मोडीत काढले

  • सोन्याने प्रथमच १.५० लाखांचा टप्पा पार केला आहे, तर चांदीने ३.३० लाखांची विक्रम

View All
advertisement