चीन-पाकिस्तानचं टेन्शन वाढणार! भारताचा सुपर एअर पॉवर प्लॅन रेडी; ड्रॅगनचा माज उतरणार
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
भारतीय हवाई दल Mission 2035 अंतर्गत १५० Rafale, ६० Sukhoi-57, २१० Tejas, ४० AMCA आणि १० S-400 मिळवून चीन पाकिस्तानला सडेतोड उत्तर देणार आहे.
नवी दिल्ली: सध्या भारतीय हवाई दल विमानांच्या कमतरतेमुळे आव्हानात्मक परिस्थितीतून जात असले, तरी पुढच्या १० वर्षांत अजेय होणार आहे. चीन आणि पाकिस्तान मिळून भारताविरुद्ध जो कट रचत आहेत, त्याला आताही सडेतोड उत्तर भारत देत आहेच मात्र त्याला आणखी चोख उत्तर देण्यासाठी भारताने आपला 'मिशन २०३५' प्लॅन केला आहे. ३ लाख कोटींचे राफेल डील आणि रशियाचे ५ व्या पिढीचे सुखोई-५७ विमान भारताच्या ताफ्यात सामील होणार असल्याने आशियातील शक्ती संतुलन पूर्णपणे बदलणार आहे.
आव्हानांच्या चक्रव्युहात भारत, पण मार्ग सापडला!
सध्या हवाई दलाकडे लढाऊ विमानांच्या तुकड्यांची कमतरता आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे शस्त्रास्त्रांचा पुरवठा रेंगाळला असून अमेरिकेसोबतच्या टॅरिफ वादामुळे तिथूनही मदतीची अपेक्षा कमी आहे. दुसरीकडे चीन आपली ५ व्या पिढीची J-20 आणि J-35 ही विमाने पाकिस्तानला देऊन भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, भारताची आगामी १० वर्षांची तयारी पाहता चीनचा हा फुगा लवकरच फुटणार आहे.
advertisement
१५० राफेल आणि ३ लाख कोटींचा व्यवहार
भारताकडे सध्या ३६ राफेल विमाने आहेत. मात्र, हवाई दलाची ताकद वाढवण्यासाठी आणखी ११४ राफेल विमानांचा व्यवहार अंतिम टप्प्यात आहे. हा व्यवहार सुमारे ३ लाख कोटी रुपयांचा असून पुढच्या काही महिन्यांत त्यावर स्वाक्षरी होईल. यातील सुरुवातीची काही विमाने थेट फ्रान्समधून येतील आणि बाकीची भारतात बनवली जातील. याव्यतिरिक्त भारतीय नौदलासाठीही २६ 'मरीन राफेल' खरेदी केले जाणार आहेत.
advertisement
रशियाचे सुखोई-५७: चीनला चोख प्रत्युत्तर
चीन-पाकिस्तानच्या जुगलबंदीला टक्कर देण्यासाठी भारत रशियाकडून ६०, Sukhoi-57E ही ५ व्या पिढीची लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या तयारीत आहे. नुकत्याच समोर आलेल्या अहवालानुसार, रशियन तज्ज्ञ ही विमाने भारतात 'HAL' च्या मदतीने बनवण्याबाबतचा व्यवहार्यता अहवाल सादर करणार आहेत. भारताकडे आधीच सुखोई-३० चे इन्फ्रास्ट्रक्चर असल्याने ही विमाने भारतात बनवणे सोपे जाणार आहे.
advertisement
१० युनिट्स S-400 आणि सुदर्शन चक्र
केवळ हल्लाच नाही, तर संरक्षणासाठीही भारताने कंबर कसली आहे. 'सुदर्शन चक्र' प्रोजेक्ट अंतर्गत भारत रशियाकडून एकूण १० S-400 डिफेन्स सिस्टम घेण्याच्या योजनेवर काम करत आहे. यापैकी ३ सिस्टिम भारताला मिळाल्या असून उरलेल्या ५ सिस्टिमसाठी नवा करार होऊ शकतो. यामुळे भारताचे आकाश शत्रूसाठी 'नो फ्लाय झोन' बनेल.
advertisement
स्वदेशी शक्ती: २१० तेजस आणि ४० AMCA
तेजस मार्क-१ए आणि २: हवाई दल ९७ अधिक तेजस विमानांची ऑर्डर देणार आहे. तसेच यावर्षी 'तेजस मार्क-२' चे प्रोटोटाइप उड्डाण करेल, जे राफेलच्या तोडीचे असेल. २०३० पर्यंत असे २१० हून अधिक तेजस ताफ्यात असतील.
AMCA प्रोजेक्ट: भारताचे स्वतःचे ५ व्या पिढीचे विमान 'एम्का' २०२५ पर्यंत प्रोटोटाइप स्टेजवर असेल आणि २०३५ पर्यंत हवाई दलात सामील होईल. विशेष म्हणजे, यात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (AI) वापर केल्यामुळे हे ५.५ पिढीचे विमान असेल, जे चीनच्या जे-३५ पेक्षा कितीतरी पटीने प्रगत असेल.
advertisement
पुढील दशकात भारतीय हवाई दलाकडे १५० राफेल, ६० सुखोई-५७, २१० तेजस आणि ४० एम्का असा बलाढ्य ताफा असेल. जेव्हा हे सर्व प्रकल्प पूर्ण होतील, तेव्हा चीन किंवा पाकिस्तानच काय, तर जगातील कोणत्याही महासत्तेला भारताच्या सीमेकडे पाहण्याची हिंमत होणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 21, 2026 2:38 PM IST
मराठी बातम्या/देश/
चीन-पाकिस्तानचं टेन्शन वाढणार! भारताचा सुपर एअर पॉवर प्लॅन रेडी; ड्रॅगनचा माज उतरणार









