मुंबईतील माटुंगा परिसरात दोन मित्रांनी सुरू केलेला ‘रँच कॅफे’ सध्या चांगलाच लक्ष वेधून घेत आहे. अक्षय पटेल आणि निशील शाह या दोघांनी मिळून हा कॅफे सुरू केला आहे. दोघांचं शिक्षण मुंबईतच झालं असून अक्षयने सीएचे शिक्षण पूर्ण केलं आहे, तर निशील सुरुवातीपासूनच पूर्ण वेळ व्यवसायात आहे



