Monsoon Health Care: पावसाळ्यात डासांपासून आजारांचा धोका, वेळीच करा हे काम, डास जवळ पण येणार नाही!
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
Monsoon Health Care: डास निर्माण झाले की, अनेक आजारांचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे पावसाळ्यात डासांपासून संरक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे.
advertisement
advertisement
पावसाळ्यात डासांपासून संरक्षण कसे करावे? याबाबत माहिती देताना डॉ. धिरज आंडे सांगतात की, पावसाळ्यात डासांची निर्मिती जास्त होते. कारण, त्यांना पोषक असं वातावरण पावसाळ्यात निर्माण झालेलं असते. सर्वत्र पावसामुळं दलदल निर्माण झाली की डासांच प्रमाण वाढतं. त्यातूनच मग विविध आजारांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे डासांपासून संरक्षण करणे गरजेचे आहे.
advertisement
advertisement
डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नये. पाणी साचल्यास लगेच त्याची योग्य विल्हेवाट लावावी. त्याचबरोबर डासांची निर्मिती ही फक्त दूषित पाण्यातच होते असे नाही. स्वच्छ पाण्यात सुद्धा डासांची निर्मिती होऊ शकते. त्यासाठी गप्पी मासे आपण त्या पाण्यात सोडू शकतो. मासे त्यातील डासांची अंडी खाऊन नाहीशी करतील आणि डासांचा प्रादुर्भाव वाढणार नाही.
advertisement
पावसाळ्यात आठवड्यातून 1 दिवस कोरडा दिवस पाळणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे नेहमीच्या वापरातील भांडे स्वच्छ होतात. त्याला सूर्यप्रकाश मिळाल्याने त्यातील काही विषाणू सुद्धा नाहीसे होतात. पावसाळ्यामध्ये घरातील स्वच्छता देखील महत्त्वाची आहे. फक्त डासांमुळेच नाही तर माशांमुळे देखील आजार पसरतात. त्यामुळे घरात डासांबरोबरच माशा सुद्धा येणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे.
advertisement
डेंग्यू, मलेरिया यासारखे आजार पावसाळ्यात जास्त जोर करतात. ताप, मळमळ होणे, डोकं दुखणे, हात पाय दुखणे यासारखे काही प्राथमिक लक्षणे आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 7 दिवसाच्यावर दुखणे असेल तर रक्त तपासणी करावी. त्याचबरोबर इतरही काही आरोग्याच्या समस्या आढळून आल्यास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखवा, असे डॉ. आंडे यांनी सांगितले.