Amravati: भाजप आणि AIMIM चे पुन्हा गळ्यात गळे, समितीही देऊन टाकली!

Last Updated:

अमरावतीच्या अचलपूर नगर परिषदमध्ये समित्यांच्या सभापतीच्या निवडीसाठी भाजपसोबत एमआयएम देखील सहभागी झाल्याचं समोर आलं आहे.

News18
News18
अमरावती: काही दिवसांपूर्वी नगरपरिषदेचे निकाल लागले आणि नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून आले त्यानंतर आता समित्यांच्या सभापतीची निवड केली जात आहे. अशातच कायम हिंदुत्वाचा गड असलेल्या अमरावतीच्या अचलपूर नगर परिषदमध्ये समित्यांच्या सभापतीच्या निवडीसाठी भाजपसोबत एमआयएम देखील सहभागी झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे भाजप आणि एमआयएमच्या युतीची चर्चा रंगू लागली आहे. मात्र, आम्ही कुठलीही युती केली नसल्याचा दावा मात्र भाजप आणि एमआयएमने केला आहे.
अचलपूर नगरपरिषद अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठी नगरपरिषद म्हणून या नगरपरिषदेची ओळख आहे. या नगरपरिषदेवर नगराध्यक्ष म्हणून भाजपच्या रूपाली माथने ह्या विजयी झाल्या आहे. दोन-चार नव्हे तर तब्बल 40 हजार मतांनी रूपाली माथने यांचा विजय या ठिकाणी झाला आहे.
मात्र, नगरसेवकांमध्ये भाजपाला या ठिकाणी फार यश आलं नाही सर्वाधिक नगरसेवक या ठिकाणी काँग्रेसचे निवडून आले आहे. असं असताना आता समित्यांच्या सभापती निवडीसाठी या ठिकाणी ज्या गटांमध्ये एमआयएम आहे तो गट देखील भाजपसोबत समित्यासाठी सहभागी झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, या सर्व प्रकाराची मला कुठलीच माहिती नसल्याचं भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांनी सांगितलं आहे.
advertisement
अचलपूर नगरपरिषदेमध्ये पक्षीय बलाबल 
काँग्रेस 15
भाजप 9
एमआयएम 3
अपक्ष 10
प्रहार 2
राष्ट्रवादी काँग्रेस 2
आता समित्याच्या सभापती निवडीसाठी मात्र सर्व पक्षांनी आप आपला फायदा बघून घेतला आहे यामध्ये भाजपला महिला बालकल्याण समिती
काँग्रेसला पाणीपुरवठा सभापती.
प्रहारला बांधकाम सभापती
राष्ट्रवादी काँग्रेस-AP आरोग्य सभापती
एमआयएमला-शिक्षण क्रीडा सभापती
advertisement
एका अपक्षाला नियोजन सभापती देण्यात आलं आहे. या सर्व प्रकारावर आता भाजपचे स्वीकृत नगरसेवक अभय माथने यांनी भूमिका मांडली आहे. "एमआयएमसोबत आम्ही कुठलीही युती केली नाही, ही संपूर्ण निवडणूक बिनविरोध झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
एमआयएमने भाजपाला समर्थन दिलं नाही. या नगरपरिषदमध्ये एमआयएमचे तीन, अपक्ष 3 आणि राष्ट्रवादी AP-2 असा गट तयार केल्याने त्यांना समिती मिळाली. त्यामुळे ही युती म्हणता येणार नाही, असं एमआयएमच्या जिल्हाध्यक्षांनी सांगितलं. दरम्यान, या संपूर्ण प्रकाराचा खापर एमआयएमने काँग्रेसवर फोडलं आहे.
advertisement
एकीकडे भाजपच्या वरिष्ठांकडून एमआयएम सोबत युती केल्याने अकोटच्या आमदारांना नोटीस पाठवल्याची घटना ताजी असताना दुसरीकडे अशा पद्धतीने समित्यांमध्ये भाजप आणि एमआयएमसोबत असल्याने मात्र आता वरिष्ठ काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Amravati: भाजप आणि AIMIM चे पुन्हा गळ्यात गळे, समितीही देऊन टाकली!
Next Article
advertisement
BMC Mayor BJP List: भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे चर्चेत, पाहा यादी..
भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे
  • मुंबईवर यंदा भाजप आपला झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे.

  • आरक्षण 'सर्वसाधारण महिला' प्रवर्गासाठी निघाल्याने भाजपमधील महिला नगरसेविकांमध्ये

  • भाजपच्या ४९ महिला उमेदवारांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे

View All
advertisement