लिंबू केसांमध्ये चोळल्यावर खरंच कोंडा जातो का? नेमका उपाय काय?
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
अन्नपदार्थांना चटकदार करण्याचं काम लिंबू करतो. लिंबूपाणी प्यायल्यावर शरीर ऊर्जावान राहतं. असे लिंबाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यापैकीच काही आपण जाणून घेणार आहोत.
advertisement
advertisement
लिंबाच्या रसात आवळा वाटून हे मिश्रण केसांना लावल्यास केसगळती कमी होऊन केसांचा पोत सुधारतो, केस छान काळेभोर होतात. तसंच केसगळतीवर उपाय म्हणून लिंबाचा तुकडा केसांमध्ये चोळण्याचा सल्लाही दिला जातो. लसूण आणि लिंबाचा रस दोन्ही एकसमान मिसळून केसांना मसाज केल्यास काहीच दिवसात उवा नष्ट होतात.
advertisement
1/2 लिटर पाण्यात लिंबाचा रस आणि चिमूटभर मीठ मिसळून प्यायल्यास पचनशक्ती भक्कम होते. शिवाय पोटाच्या विकारांवर आराम मिळतो. चक्करसारखं वाटल्यास 250 ग्रॅम पाण्यात लिंबाचा रस आणि थोडं मध घालून प्यायल्यास आराम मिळतो.
advertisement
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.