एक नाचणी, अनेक आजारांवर भारी! तुम्ही खाताय ना 'हे' पदार्थ?

Last Updated:
वजन कमी करण्यासाठी नाचणीची भाकरी खाण्याचा सल्ला दिला जातो. खरंतर नाचणीचं पीठ आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असतं. या पिठाची भाकरी खाल्ल्यास शरिराला कॅल्शियम, प्रोटीन, आयर्न आणि फायबरसारखे अनेक पोषक तत्त्व मिळतात.
1/5
आपल्या भारतात उत्पादित होणाऱ्या धान्यांपैकी नाचणी हे एक महत्त्वाचं पीक. आता तर नाचणीची बिस्किटं आणि केकदेखील मिळतो. वजन कमी करण्यासाठी लोक आवर्जून नाचणीचे पदार्थ खरेदी करतात.

advertisement
2/5
प्राचीन काळात ग्रामीण भागातील वृद्ध व्यक्ती नाचणीची भाकरी खायचे. शिवाय आयुर्वेदातदेखील नाचणीच्या पौष्टिक तत्त्वांचा उल्लेख आढळतो. इतकंच नाही, तर अनेक आयुर्वेदिक औषधांमध्येसुद्धा नाचणीचा वापर केला जातो.

3/5
नाचणी प्रत्येक ऋतूमध्ये आरोग्यासाठी फायदेशीर असते, परंतु हिवाळ्यात ती अधिक उपयुक्त ठरते. थंडीत शरीर उबदार ठेवण्यासाठी नाचणी खाण्याचा सल्ला दिला जातो.

4/5
लघवीसंबंधित आजारांवरही नाचणी गुणकारी असते. शिवाय या नाचणीमुळे अशक्तपणादेखील दूर होतो. नाचणी पचायला हलकी असल्याने पोटसुद्धा व्यवस्थित साफ होतं.

5/5
नाचणीत डी जीवनसत्त्व चांगल्या प्रमाणात असतं. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. खरंतर डी जीवनसत्त्व उन्हात मिळतं, परंतु सध्या विद्यार्थ्यांच्या दिवसाचा सर्वाधिक वेळ शाळा आणि ट्युशनमध्ये जातो. गृहिणींना घराबाहेर पडण्याची सवड नसते. तर, नोकरी, व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींनाही सवडीने ऊन घ्यायला वेळ नसतो. त्यामुळे आहारात नाचणीचा समावेश करणं फायदेशीर ठरतं. 

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement