Summer Fruits: उष्माघात आणि डिहायड्रेशनला ठेवतील लांब, उन्हाळ्यात ही फळे खा अन् बिनधास्त राहा!

Last Updated:
Summer Fruits: उन्हाळा सुरू होताच पचनाविषयीचे आजार निर्माण होतात. त्यासाठी उन्हाळी फळं आहारात असणं अत्यंत गरजेचं आहे.
1/7
उन्हाळ्यात पचनशक्ती कमजोर होते आणि त्यातून विविध आजार निर्माण होतात. वाढलेले तापमान आणि त्यामुळे होणारा असह्य उकाडा यामुळे शरीराला थंड ठेवणे आवश्यक असते. सर्वात महत्वाचे म्हणजे उन्हाळ्यात डिहायड्रेशन ही समस्या जास्त जोर धरते. त्यासाठी आहारात कोणती फळं आहारात घ्यावीत? हे जाणून घेणे महत्वाचे ठरते. याबाबत अमरावती येथेली डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी माहिती दिलीये.

advertisement
2/7
टरबूज हे फळ उन्हाळ्यात शरीरासाठी अत्यंत उपयोगी ठरते. कारण त्यामध्ये 92 टक्के पाणी असते. तुम्ही दररोज सुद्धा योग्य प्रमाणात आहारात टरबूजचा समावेश करू शकता. टरबूजमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर डोळे आणि त्वचेसाठी सुद्धा ते फायद्याचे ठरते. 

3/7
संत्रामुळे सुद्धा रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर स्ट्रोकचा धोका कमी होतो. त्यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. संत्र्यामध्ये 86 टक्के पाणी असते. संत्रा हे फळ आकाराने छोटे असूनही त्यात पाण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे उन्हाळ्यात आहारात संत्रा उपयोगी ठरतो. 

4/7
लिंबू हे आरोग्यासाठी अत्यंत फायद्याचे ठरते. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी, सायट्रिक ऍसिड आणि अँटिऑक्सिडंट्स असल्याने ते शरीरासाठी आरोग्यवर्धक आहे. लिंबात 88 ते 89 टक्के पाणी असते. लिंबामुळे पचन सुधारते त्यामुळे उन्हाळ्यामध्ये लिंबूचा समावेश आहारात असणे गरजेचे आहे. 

5/7
द्राक्षांमध्ये अँटीऑक्सिडंट्स असल्याने ते आरोग्यासाठी अतिशय फायद्याचे ठरते. त्याचबरोबर त्यात 80 टक्के पाण्याचे प्रमाण असते. द्राक्षात शुगरचे प्रमाण असल्याने थकल्यास तुम्हाला लगेच ऊर्जा मिळते. त्यामुळे उन्हाळ्यात तुम्ही द्राक्षाचे सेवन केले पाहिजे. 

6/7
नारळ पाण्यात नैसर्गिकरित्या इलेक्ट्रोलाइट्स असल्याने शरीराला त्वरित हायड्रेट करते. त्याचबरोबर वजन कमी करण्यास मदत करते. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास सुद्धा मदत करते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे किडनी स्टोनचा धोका कमी होतो. त्यामुळे उन्हाळ्यात नारळ पाणी सुद्धा आरोग्यासाठी महत्वाचे ठरते. 

7/7
उन्हाळा सुरू होताच पचनाविषयीचे आजार निर्माण होतात. त्यासाठी उन्हाळी फळं आहारात असणं अत्यंत गरजेचं आहे. उन्हाळ्यात तुमच्या शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी मदत करणारी फळं टरबूज, लिंबू, संत्रा, द्राक्षे, स्ट्रॉबेरी, टोमॅटो, काकडी, नारळ पाणी ही आहेत. 

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement