ॲसिडिटीचा त्रास होईल दूर, दररोज ताक पिण्याचे शरीराला फायदेच फायदे, पण प्यावं किती?

Last Updated:
उन्हाळ्यात दही खाण्यापेक्षा ताक पिण्याचा सल्ला दिला जातो. अनेकजण थंडगार ताक प्यायला प्राधान्य देखील देत असतात.
1/7
ताक पिणं हे आरोग्यासाठी उत्तम मानलं जातं. त्यामुळे उन्हाळ्यात दही खाण्यापेक्षा ताक पिण्याचा सल्ला दिला जातो. अनेकजण थंडगार ताक प्यायला प्राधान्य देखील देत असतात.

advertisement
2/7
आपल्यापैकी अनेकजण वजन कमी करण्यासाठी देखील रोज ताक पीत असतात. पण खरंच ताक प्यायल्याने आपलं वजन कमी होतं का? किंवा ताकाचे आपल्याला कसे फायदे होतात? याविषयी छत्रपती संभाजीनगर येथील आहारतज्ज्ञ मंजू मठाळकर यांनी लोकल18 सोबत बोलताना माहिती दिलीये.

3/7
ताकात पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, लोह, फॉस्फोरस, इत्यादी खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात. तसेच ताकात 90 टक्क्यांपेक्षा जास्त पाणी असतं. तर फॅट्सचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे अनेक जण आपल्या डायटमध्ये ताकाचा समावेश करतात.

4/7
फॅट कमी असल्यामुळे अनेक जण दररोज ताक पितात. जर जेवणाच्या वेळेस ताक पिलं किंवा जेवणाच्या आधी किंवा मधल्या वेळेत देखील ताक प्यायल्यास पोट भरल्यासारखं होतं आणि त्यातून तुम्हाला पोषण देखील मिळतं, असं आहारतज्ज्ञ सांगतात.

5/7
जर तुम्ही ताकाचा समावेश रोजच्या आहारात केल्यास ॲसिडिटीचा त्रास कमी होतो किंवा ॲसिडिटीच होत नाही. तसेच ताकामध्ये प्रोबायोटिक्स असतात आणि ते आपल्या आतड्यातील सुक्ष्मजीवांना मदत करतात.

6/7
त्यामुळं आपलं आरोग्य चांगलं राहतं. तसेच ताकामध्ये फॅट कमी असल्यामुळे शरीरात कॅलरीज देखील कमी जातत. हेच आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरतं. त्यामुळे वजन घटण्यास देखील लाभ होतो.

7/7
आपल्या शरीरासाठी ताक पिणं फायदेशीर असतं. परंतु, केवळ ताकच पिऊन चालणार नाही. त्यासोबत चांगला आहार देखील गरजेचा आहे. रोजचा आहार संतुलित असावा. त्यासोबत रोज 400 मिली ताक घेणं आरोग्यासाठी लाभदायी ठरतं. जर तुम्ही अशा पद्धतीने ताक घेतलं तर तुमचं वजन कमी व्हायला मदत होते आणि तुमच्या शरीराचं आरोग्य उत्तम राहतं. कुठल्याही प्रकारचा ॲसिडिटीचा त्रास होत नाही, असंही आहारतज्ज्ञ मंजू मठाळकर सांगतात.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement