Helath Tips : बदाम की अक्रोड, मेंदूसाठी काय खाणं फायदेशीर? हे वाचा

Last Updated:
Healthy Food: ड्रायफ्रूट्स हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी मानले जातात. अनेकजण मेंदूच्या चांगल्या वाढीसाठी बदाम आणि अक्रोड खाण्याला प्राधान्य देतात.
1/5
ड्रायफ्रूट्स हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी मानले जातात. शरीरासाठी आवश्यक पोषक घटक त्यातून मिळत असतात. विशेष करून बदाम आणि अक्रोड खाल्ल्याने मेंदूसाठी जास्त फायदा होतो, असं सांगितलं जातं. पण अक्रोड खाणं जास्त लाभदायी की बदाम याबाबत अनेकांना संभ्रम असतो. याबाबत छत्रपती संभाजीनगरमधील आहारतज्ज्ञ प्राची डेकाटे यांनी माहिती दिलीये.

advertisement
2/5
मेंदूच्या वाढीसाठी आपण बदाम आणि अक्रोड खात असतो. पण हे दोन्ही खाणं देखील आपल्या शरीरासाठी विशेष करून मेंदूसाठी फायदेशीर ठरते. जर तुम्ही बदाम खात असाल तर ते बदाम तुम्ही भिजून खायला हवेत. त्यासोबत तुम्ही अक्रोड देखील भिजवून खाल्ले तर त्यातून जास्त फायदे हे मिळतात. साधारण चार ते पाच बदाम आणि एक मूठभर अक्रोड दररोज खाल्ले तर ते जास्त लाभदायी ठरते, असं आहारतज्ज्ञ सांगतात.

3/5
लहान मुलांना तुम्ही दररोज अक्रोड खायला देऊ शकता. अक्रोडमध्ये मोठ्या प्रमाणात ओमेगा थ्री असतो आणि ओमेगा थ्री आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी असतो. तसेच त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. पेशींना डॅमेज होण्यापासून ते मदत करतं.

4/5
बदामात मोठ्या प्रमाणात ई जीवनसत्त्व असतं आणि ते चांगल्या आरोग्यासाठी गरजेचं असतं. तसेच बदामात असणारं मॅग्नेशियम मेंदूसाठी फायदेशीर ठरतं. त्यामुळे मेंदूची नर्व डॅमेज होण्यापासून मदत होते, असं डेकाटे सांगतात.

5/5
अक्रोड आणि बदाम दोन्हीही मेंदूच्या आरोग्यासाठी लाभदायी मानलं जातं. रात्री भिजवून सकाळी खाल्ल्याने त्याचा फायदा होता. परंतु, कोणतीही गोष्ट प्रमाणात खाणं आरोग्यदायी मानलं जातं. त्याचा अतिरेक झाल्यास अपायकारक देखील ठरू शकतं, असंही आहारतज्ज्ञ सांगतात.

Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement