advertisement

छातीतील जळजळीमुळे त्रस्त आहात? ‘या’ घरगुती उपायामुळे मिळेल आराम

Last Updated:
छातीत जळजळ होण्याची अनेक कारणे आहेत मात्र घरगुती उपायांनी यावर आराम मिळू शकतो.
1/8
 बहुतेक लोकांना हार्ट बर्न म्हणजेच छातीत जळजळ होण्याचा त्रास होतो. छातीत जळजळ अनेक कारणांमुळे होऊ शकते. ती करणे नेमकी कोणती आहेत? आणि जळजळ होत असल्यास त्यावर कोणते घरगुती उपाय आपल्याला करता येऊ शकतात? याबाबत <a href="https://news18marathi.com/maharashtra/wardha/">वर्धा</a> येथील आयुर्वेदिक डॉक्टर नितीन मेशकर यांच्याकडून जाणून घेऊयात.
बहुतेक लोकांना हार्ट बर्न म्हणजेच छातीत जळजळ होण्याचा त्रास होतो. छातीत जळजळ अनेक कारणांमुळे होऊ शकते. ती करणे नेमकी कोणती आहेत? आणि जळजळ होत असल्यास त्यावर कोणते घरगुती उपाय आपल्याला करता येऊ शकतात? याबाबत वर्धा येथील आयुर्वेदिक डॉक्टर नितीन मेशकर यांच्याकडून जाणून घेऊयात.
advertisement
2/8
अवेळी जेवण, अत्याधिक चिंता, मानसिक ताण, मद्यपान, धूम्रपान, तंबाखू यासारख्या पदार्थांचे सेवन, अति प्रमाणात फास्ट फूडचं सेवन, या कारणामुळे छातीत जळजळ म्हणजेच आम्लपित्ताचा, ऍसिडिटीचा त्रास होत असतो.

3/8
यामुळे घशात आग होणे, तोंडाला पाणी सुटणे, पोटात, छातीत जळजळ होणे, भूक न लागणे, सतत पोट फुगण्याचा त्रास होणे, मानेच्या नसा लागणे, हात पाय दुखणे, डोके दुखणे, अशा प्रकारचे आपल्याला लक्षणे दिसतात, असं डॉ मेशकर सांगतात.

4/8
यावर उपाय म्हणून आपल्याला वेळत जेवण म्हणजे सकाळचे जेवण बारा वाजण्याच्या आधी आणि रात्रीचे जेवण नऊ वाजण्याच्या आधी करून घ्यायला हवं. नाश्त्यामध्ये जास्तीत जास्त फळांचा वापर आपल्याला करायला पाहिजे. डाळिंब, खजूर, मनुका यासारख्या पदार्थांचं सेवन करायला पाहिजे. आहारात पालेभाज्या कमी आणि फळभाज्यांचा वापर जास्त करावा.

5/8
अत्याधिक पाणी हे सुद्धा आम्लपित्ताला कारण आहे. त्यामुळे पाणी वारंवार न पिता थोडं-थोडं प्यायला पाहिजे. रात्री झोपण्याच्या आधी एक चमचा त्रिफळा चूर्ण घ्यायला पाहिजे. त्यामुळे पोट साफ राहण्यास मदत होते. तसेच विलायची आणि खडीसाखर याची पूड करून 1-1 चमचा सकाळ -दुपार- संध्याकाळ असे घेतल्यास ऍसिडिटीवर आराम मिळू शकतो. तसेच रात्री एक ग्लास पाण्यात एक चमचा सोप टाकून सकाळी ते पाणी प्यायला पाहिजे. असे केल्यास देखील ऍसिडिटीपासून मुक्तता मिळू शकते.

6/8
रक्तदाब वाढणे, कोलेस्टेरॉल वाढणे, छातीत जळजळ होणे, डोके दुखणे, मानेच्या नसा लागणे हा सर्व त्रास ऍसिडिटी मुळे होऊ शकतो. अशा प्रकारचे त्रास असणाऱ्या रुग्णांनी वर्षातून एक वेळा वमन चिकित्सा करून घेतल्यास त्यांना फायदा होऊ शकतो, असा सल्ला देखील आयुर्वेदिक डॉक्टर मेशकर यांनी दिला. चुकीच्या वेळी खाणे, अनहेल्दी पदार्थ खाण्याच्या सवयी, जास्त तेलकट-मसालेदार पदार्थ खाणे आणि त्यात धकाधकीचे जीवन, झोप पुरेशी न होणे. ही छातीत जळजळ होण्याची कारणे असल्याचं डॉक्टर सांगतात.

7/8
छातीत जळजळ होण्याच्या त्रासातून मुक्तता मिळविण्यासाठी काही लोक स्वतःहून अनेक प्रकारची औषधे घेण्यास सुरुवात करतात. मात्र तुम्ही काही सोप्या घरगुती उपायांनी देखील या त्रासावर मात करू शकता. खडीसाखर आणि वेलचीपुडचा उपयोग आपल्याला करता येऊ शकतो. तसेच सोपीचे पाणीही ऍसिडिटी पासून अराम देऊ शकते. अशाप्रकारे छातीत होणाऱ्या जळजळीवर डॉक्टरांनी सांगितलेले काही घरगुती उपाय अवश्य करून पाहावेत.

8/8
(टीप : बातमीतील मतं ही तज्ज्ञांची वैयक्तिक आहेत. त्याचे अनुकरण करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. News18 मराठी त्याची हमी देत नाही.)

Gold Price : ऐन लग्नसराईत खिशावरचा भार वाढला, सोन्यानं बजेट बिघडवलं, दर ऐकाल तर डोळे होतील पांढरे
ऐन लग्नसराईत खिशावरचा भार वाढला, सोन्यानं बजेट बिघडवलं, दर ऐकाल तर डोळे होतील पा
  • लग्नासाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत

  • जागतिक बाजारातील घडामोडी आणि लग्नसराईमुळे वाढलेली मागणी यामुळे सोन्याच्या दराने

  • सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढल्याने ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

View All
advertisement