विद्यार्थ्यांनी परीक्षा काळामध्ये कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा? वाचा महत्त्वाच्या टिप्स

Last Updated:
परीक्षा काळामध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच आपल्या शरीराची काळजी घेणे देखील तेवढेच गरजेचे असते.
1/7
येत्या काहीच दिवसांमध्ये दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु होणार आहेत. या परीक्षा काळामध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच आपल्या शरीराची काळजी घेणे देखील तेवढेच गरजेचे असते. शरीराची देखभाल करत असताना आपल्या आहारात सकस अन्न घेण्याची काळजी विद्यार्थ्यांनी घेणं तितकच गरजेचं असतं.

advertisement
2/7
 पौष्टिक आहार घेतल्यास परीक्षा काळामध्ये शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राखण्यास मदत होते. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा काळामध्ये कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा? याविषयी  आहार तज्ज्ञ गीता कोल्हे यांनी माहिती दिली आहे.
पौष्टिक आहार घेतल्यास परीक्षा काळामध्ये शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राखण्यास मदत होते. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा काळामध्ये कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा? याविषयी जालन्यातील आहार तज्ज्ञ गीता कोल्हे यांनी माहिती दिली आहे.
advertisement
3/7
21 फेब्रुवारीपासून इयत्ता बारावी तर 1 मार्चपासून इयत्ता दहावीच्या परीक्षांना सुरुवात होत आहे. परीक्षा काळामध्ये अनेकदा विद्यार्थ्यांचे आपल्या आहाराकडे दुर्लक्ष होते. यामुळेच अनेक शारीरिक आणि मानसिक समस्या उद्भवू शकतात.

4/7
 त्यामुळे शरीर आणि मन तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपल्या आहारात योग्य प्रकारच्या अन्नाचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी आठ तास झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे. पूर्ण झोप झाल्यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होते आणि मन आणि शरीर प्रसन्न राहते.

5/7
दैनंदिन आहार हा हलका असावा. नाश्त्यामध्ये कडधान्याची उसळ भिजवलेले शेंगदाणे आणि गूळ खजूर बदाम अक्रोड यासारख्या सुख्या मेव्याचा समावेश देखील असावा. जेवणामध्ये वरण-भात पोळी भाजी असा पौष्टिक आहार घ्यावा त्याचप्रमाणे परीक्षा काळामध्ये बाहेरचे फास्ट फूड खाणे टाळावे. शक्यतो घरचाच आहार घ्यावा.

6/7
 बाहेरच्या जेवणामध्ये मोठ्या प्रमाणावर तेल असते जे शरीरासाठी अत्यंत घातक असते. त्याचप्रमाणे त्यांचा वारंवार वापर केलेला असतो जो शरीरासाठी अत्यंत वाईट असतो. रात्रीच्या जेवणामध्ये थालीपीठ, वरणफळ, धपाटे खिचडी इत्यादी हलक्या अन्नाचा समावेश करावा, असं गीता कोल्हे यांनी सांगितलं.

7/7
तसेच या काळामध्ये भरपूर पाणी प्यावं आणि आनंदी राहावं. आनंदी राहण्यासाठी तुम्ही एखादा आवडीचा व्यायाम प्रकार करू शकता. फिरणं चालणं असेल सूर्यनमस्कार असतील. त्याचबरोबर दोरीवरच्या उड्या यासारखा कुठलाही एक आवडता व्यायाम प्रकार करावा. ज्यामुळे आपण आनंदी राहून परीक्षेत आपल्याला आनंदाने सामोरे जाता येईल, असंही गीता कोल्हे यांनी सांगितलं.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement