काळा असो की पांढरा, फक्त ‘हा’ पदार्थ खाल्ला तर दवाखान्याची गरजच नाही!
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
ज्यांना संधिवात आहे किंवा हाडांच्या तक्रारी आहेत अशा लोकांनी या पदार्थाचे सेवन केलं तर अत्यंत उपयुक्त ठरतं.
थंडीच्या दिवसांत तीळ खाण्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. तिळात उष्णता असते आणि त्यामुळे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. विविध पदार्थांच्या माध्यमातून तीळ आपण खाऊ शकतो. पण तीळ खाण्याचे प्रमाण किती असावे? आणि निरोगी जीवनासाठी किती प्रमाणात तीळ खावेत? याबाबत छत्रपती संभाजीनगर येथील आहार तज्ज्ञ अलका कर्णिक यांनी माहिती दिली आहे.
advertisement
तिळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये खनिजे आहेत. कॅल्शियम मॅग्नेशियम, फॉस्फरस देखील तिला मध्ये मोठ्या प्रमाणात आहे. हे घटक आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असतात. बऱ्याच लोकांना असा गैरसमज असतो की त्यामध्ये भरपूर उष्णता आहे. तर त्यामध्ये भरपूर उष्णता आहे पण जर त्याचा अतिरेक सेवन केलं तरच याचा आपल्या शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतो.
advertisement
आपण जर व्यवस्थित प्रमाणात तीळ खाल्ले तर त्याचा कोणताही दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत नाही. हाडांचे दुखणे, हाडांची वाढ, हाडांची झीज यासाठी जर कुठला घटक गरजेच असेल तर तो तीळ हा आहे. साठी रोज एक चमचा तरी तीळ खाणं गरजेचं आहे. पण हे तीळ भाजून खावेत. तसेच सोबत समप्रमाणात जवस घेतलं तर हाडांचे दुखणे कमी होते, असं आहार तज्ज्ञ सांगतात.
advertisement
तुम्ही कॅल्शियमची गोळी घेत असाल तर दररोज तुम्ही एक चमचा तीळ खाल्ले तर तुम्हाला गोळी घेण्याची गरज सुद्धा पडणार नाही. तसंच घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी नॅचरल पद्धतीने तीळ हे दररोज एक चमचा खायलाच हवेत. तिळाचं तेल देखील असतं. याच्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई आहे. हे आपल्या रक्तवाहिनीसाठी गरजेचं असतं, असंही कर्णिक यांनी सांगितलं.
advertisement
advertisement
advertisement
काळे तीळ आणि पांढरे तीळ दोन्हीही आपल्याला तेवढेच उपयुक्त घटक हे देतात. ज्यांना संधिवात आहे किंवा हाडांच्या तक्रारी आहेत अशा लोकांनी तिळाचे सेवन केलं तर अत्यंत उपयुक्त ठरतं. त्यासोबतच काळे तीळ भिजवून किंवा भाजून कढीपत्त्यासोबत खावीत किंवा पत्ता कोबीची पानं शिजवून त्यात तीळ टाकून खाल्ले तर तुम्हाला खूप फायदा होतो, असंही कर्णिक सांगतात.