भयावह! सात जणांनी घेरलं अन् हॉटेल मालकाला केली बेदम मारहाण, बारामतीतील घटनेचा CCTV VIDEO
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
पुणे जिल्ह्याच्या बारामतीत हप्तेवसुलीची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं हप्ता न दिल्याच्या कारणातून सहा ते सात जणांच्या टोळक्याने एका हॉटेल चालकाला बेदम मारहाण केली आहे.
जितेंद्र जाधव, प्रतिनिधी बारामती: पुणे जिल्ह्याच्या बारामतीत हप्तेवसुलीची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं हप्ता न दिल्याच्या कारणातून सहा ते सात जणांच्या टोळक्याने एका हॉटेल चालकाला बेदम मारहाण केली आहे. आरोपींनी हॉटेलमध्ये शिरून आधी कामगारांना दमदाटी केली. त्यानंतर मालक कोण आहे? असं विचारत मारहाण केली. मारहाणीचा हा सगळा प्रकार हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रगती नगर परिसरातील आहे. इथं तक्रारदाराचं एक हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये घुसून काही तरुणांनी हप्ता मागितला होता. मात्र हॉटेल मालकाने हप्ता देण्यास नकार दिला.
याच कारणातून शुक्रवारी रात्री साडे आठच्या सुमारास सहा ते सात तरुण दुचाकीने त्याठिकाणी आले. त्यांनी हॉटेलमध्ये घुसून कामगारांकडे मालक कोण आहे? मालक कुठाय? अशी विचारणा केली. यावेळी मालक समोर आले. त्यांनी टोळक्याकडे काय झालं? अशी विचारणा केली. यावेळी टोळक्याने त्यांना दमदाटी करत हॉटेलच्या बाहेर नेलं.
advertisement
बारामतीत हप्ता न दिल्याच्या कारणातून हॉटेल मालकाला बेदम मारहाण pic.twitter.com/G9jVoqPhic
— News18Lokmat (@News18lokmat) December 27, 2025
याठिकाणी सर्व आरोपींनी हॉटेल मालकाला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हुडी घालून आलेले आरोपी मालकाला मारताना स्पष्टपणे दिसत आहे. मारहाणीच्या या घटनेनंतर पीडित हॉटेल मालकाने तातडीने बारामती शहर पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी सर्व आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
view commentsLocation :
Baramati,Pune,Maharashtra
First Published :
Dec 27, 2025 12:24 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
भयावह! सात जणांनी घेरलं अन् हॉटेल मालकाला केली बेदम मारहाण, बारामतीतील घटनेचा CCTV VIDEO








