How To Avoid Sleep : ऑफिसमध्ये दुपारी जेवल्यानंतर झोप येते? हे उपाय करा, उडून जाईल झोप..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
बऱ्याचदा लोकांना दुपारी जेवण केल्यानंतर झोप येते. यामुळे काम करण्यात खूप अडचणी येतात. परंतु, काही सोप्या टिप्स तुम्हाला या झोपेच्या समस्येपासून वाचवू शकतात. चला पाहूया दुपारची झोप घालवण्याचे काही सोपे उपाय.
दुपारच्या जेवणात सँडविच किंवा भात यांसारखे उच्च कार्बयुक्त पदार्थ खाणे टाळा. आहार संतुलित करण्यासाठी त्यामध्ये काही प्रथिने, चरबी आणि <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/health-tips-chili-is-hot-but-very-beneficial-in-summer-best-for-these-5-diseases-mhpj-1167928.html">भाज्या</a> समाविष्ट करा. तसेच एकाच वेळी जास्त अन्न खाणे टाळावे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही नाश्त्यामध्ये <a href="https://news18marathi.com/lifestyle/summer-tips-special-way-to-eat-cucumber-in-summer-cucumber-benefits-in-summer-mhpj-1169615.html">पौष्टिक गोष्टी</a> घेतल्या तर तुम्ही दिवसभर ऊर्जावान राहता आणि झोपही येत नाही. जे लोक नेहमी किंवा अनेकदा नाश्ता सोडून थेट दुपारचे जेवण करतात, त्यांच्यामध्ये ही समस्या अधिक सामान्य आहे.











