Resolution : नव्या वर्षाचे नवे संकल्प, स्वत:ला वचन द्या आणि संकल्प पूर्ण करण्याचा ध्यास घ्या

Last Updated:

आता येणाऱ्या 2026 या वर्षासाठी काही संकल्प करायचे असतील तर या टिप्सचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो.  आयुष्यात सकारात्मक बदल करायचे असेल, तर त्यादृष्टीनं पावलं उचलणं गरजेचं आहे. इथे दिलेले काही प्लान तुम्हाला कदाचित आवडतीलही.

News18
News18
मुंबई : डिसेंबर महिना आता मध्यावर आला. डिसेंबर म्हणजे नवीन वर्षाची उत्सुकता मनात असते....काही गोष्टी करायच्या असतील तर नवीन वर्षापासून सुरु करु असे अनेकांचे संकल्प असतात.
नवीन वर्ष नवीन आशा आणि उत्साह घेऊन येते. वाईट गोष्टी मागे सोडून एक नवीन आणि सकारात्मक सुरुवात करण्याची ही वेळ आहे. नवीन वर्षाचे मोठे संकल्प केले तरी ते यशस्वी होतातच असं नाही, अनेकदा शेवटी निराशा होते.
आता येणाऱ्या 2026 या वर्षासाठी काही संकल्प करायचे असतील तर या टिप्सचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो.  आयुष्यात सकारात्मक बदल करायचे असेल, तर त्यादृष्टीनं पावलं उचलणं गरजेचं आहे. इथे दिलेले काही प्लान तुम्हाला कदाचित आवडतीलही.
advertisement
बचत - नवीन वर्षाच्या सुरुवातीला बचत करण्याचा संकल्प करू शकता. येत्या वर्षात अनावश्यक खर्च कमी करणं टाळा आणि फक्त आवश्यक खर्चांवर लक्ष केंद्रित कराल. यासाठी, मासिक उत्पन्नाचा काही भाग बाजूला ठेवून तो वाचवण्याची सवय देखील लावू शकता. हे पैसे भविष्यात किंवा आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी पडू शकतात.
advertisement
वेळेचं व्यवस्थापन - रोजच्या धावपळीत वेळेचं व्यवस्थापन करणं कठीण होतं. म्हणूनच, वेळेचं व्यवस्थापन करण्याचा आणि व्यावसायिक जीवनासाठी तसंच वैयक्तिक जीवनासाठी पुरेसा वेळ काढण्याचा संकल्प करु शकता.
आरोग्यावर लक्ष केंद्रित करा - या नवीन वर्षात, आरोग्याला प्राधान्य देण्याचा संकल्प करा. कामाच्या गडबडीत आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. अशा परिस्थितीत, दररोज व्यायाम करण्याचा आणि निरोगी आहार घेण्याचा संकल्प करता येईल.
advertisement
डिजिटल डिटॉक्स - या नवीन वर्षात, डिजिटल डिटॉक्स करण्याचा संकल्प करा. स्वतःला वचन द्या सोशल मीडियावर किंवा फोनवर जास्त वेळ घालवणार नाही. याऐवजी, मोकळ्या वेळेत काही छंद जोपासू शकता, स्वत:ला वेळ देऊ शकता.
नवीन ठिकाणं एक्सप्लोर करा -  नवीन वर्षात नवीन ठिकाणं एक्सप्लोर करण्याचा संकल्प करू शकता. येत्या वर्षात, व्यावसायिक व्यस्ततेतून वेळ काढून कुटुंब आणि मित्रांसह नवीन ठिकाणी जा, प्रवास करा. यामुळे सामान्य ज्ञानही वाढेल.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Resolution : नव्या वर्षाचे नवे संकल्प, स्वत:ला वचन द्या आणि संकल्प पूर्ण करण्याचा ध्यास घ्या
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement