IND vs SA : दुसऱ्या टी-ट्वेंटीमधील पराभवानंतर गंभीर अन् हार्दिकमध्ये राडा? ड्रेसिंग रुममधील Video लीक
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Gautam Gambhir Fight With Hardik Pandya : टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात हार्दिक पांड्या आणि गौतम गंभीर यांच्यातील संभाषण दिसतंय.
Indian Dressing room Viral Video : न्यू चंदिगडच्या स्टेडियमवर भारत आणि साऊथ अफ्रिका यांच्यात सामना खेळवला गेला होता. या सामन्यात टीम इंडियाला पराभव स्विकारावा लागला होता. अशातच आता तिसरा सामना धर्मशाळा इथं खेळवला जाईल. या सामन्याआधी आता टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये गंभीर आणि हार्दिक पांड्या यांच्यात महत्त्वाची चर्चा झाली. त्यावेळी दोघांचा वाद झाला की काय? असा सवाल विचारला जातोय. त्याचा एक व्हिडीओ देखील समोर आलाय.
दुसऱ्या टी-20 नंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि अनुभवी ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पांड्या ड्रेसिंग रूममध्ये गप्पा मारतान दिसत होता. यावेळी गंभीर चिडलेला दिसत होता, असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे पांड्या आणि गंभीर यांच्यात राडा झाला होता की काय? असा सवाल सोशल मीडियावर विचारला जात आहे.
advertisement
Heated argument between Gautam Gambhir and Hardik Pandya after yesterday's loss.
Hardik was the vice captain of the Indian T20I team in the T20 World Cup 2024. Now he removed him from even the vice captaincy, so now what does Gambhir want from Hardik pic.twitter.com/8MXhXZDYyE
— Tejash (@Tejashyyyyy) December 12, 2025
advertisement
हार्दिक पांड्या आणि गौतम गंभीर यांच्यात गंभीर चर्चा सुरू होती. मॅचमध्ये काय चुकलं यावर दोघंही चर्चा करत असावेत, असं बोललं जातंय. त्यामुळे दोन्ही खेळाडूंमध्ये नॉर्मल चर्चा सुरू होती. दोघांमध्ये कोणतीही बाचाबाची किंवा वाद नव्हता. गंभीरने आपलं मत हार्दिकसमोर मांडलं. त्यावर हार्दिकने देखील होकारार्थी मान हलवल्याचं पहायला मिळालं.
दरम्यान, भारतीय टीमचा ऑलराउंडर हार्दिक पांड्या याने दुखापतीमधून परतल्यानंतर टी-20 क्रिकेटमध्ये चांगली सुरुवात केली, पण त्याला आपला फॉर्म लगेच दुसऱ्या मॅचमध्ये कायम ठेवता आला नाही. त्याचे शेवटचे 2 टी-20 मॅच एकदम उलट-सुलट राहिले. एका मॅचमध्ये त्याने तूफानी खेळ दाखवला, तर दुसऱ्या मॅचमध्ये तो रन करण्यासाठी संघर्ष करताना दिसला.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 13, 2025 12:55 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : दुसऱ्या टी-ट्वेंटीमधील पराभवानंतर गंभीर अन् हार्दिकमध्ये राडा? ड्रेसिंग रुममधील Video लीक








