Warning Signs : शरीराच्या संकेतांकडे दुर्लक्ष नको, आरोग्याच्या समस्यांचे असू शकतात अलार्म
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
अनेकदा, साधा थकवा किंवा ताण म्हणून या संकेतांकडे वारंवार दुर्लक्ष करत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण हीच लक्षणं अनेक गंभीर आरोग्य समस्यांची सुरुवातीची लक्षणं असू शकतात. यातील काही लक्षणं आणि त्यामागील आजारांबद्दल जाणून घेऊया.
मुंबई : यंत्रामधे कोणतीही गडबड असेल तर वाहन किंवा कुठलीही यंत्रावर चालणारी वस्तू आवाज करते. आपलं शरीरही एका यंत्रासारखं आहे. शरीरात कुठलीही अंतर्गत समस्या असेल तर ते सूचित करण्यासाठी सतत अलार्म करत असतं. या संकेतांकडे अनेकदा दुर्लक्ष होतं.
अनेकदा, साधा थकवा किंवा ताण म्हणून या संकेतांकडे वारंवार दुर्लक्ष करत असाल तर वेळीच सावध व्हा.
कारण हीच लक्षणं अनेक गंभीर आरोग्य समस्यांची सुरुवातीची लक्षणं असू शकतात. यातील काही लक्षणं आणि त्यामागील आजारांबद्दल जाणून घेऊया.
सतत थकवा येणं, गोष्टी लक्षात ठेवण्यात अडचण येणं, लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणं किंवा ब्रेन फॉग हे झोपेच्या कमतरतेमुळेच नाही तर थायरॉईड ग्रंथीचं काम नीट न होणं, शरीरातील चयापचय मंदावण्याचंही लक्षण असू शकतं.
advertisement
व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे ब्रेन फॉग, चिडचीड, सुन्नपणा आणि तीव्र थकवा येऊ शकतो, कारण हे व्हिटॅमिन मेंदू आणि नसांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.
खाल्ल्यानंतर थकवा - सुस्ती, तंद्री किंवा जडपणा जाणवत असेल आणि खाल्ल्यानंतर लगेच झोप येत असेल, तर हे इन्सुलिन प्रतिरोध किंवा मधुमेहाचं लक्षण असू शकतं. यावेळी शरीर अन्नातून मिळणाऱ्या साखरेचं उर्जेमधे रूपांतर करू शकत नाही, ज्यामुळे रक्तातील साखर वाढते आणि उर्जेची पातळी कमी होते.
advertisement
सकाळी सांधे जड होणं आणि सूज येणं - जागं झाल्यानंतर तीस मिनिटांपेक्षा जास्त काळ हात आणि पायांच्या सांध्यात जडपणा, वेदना किंवा सूज येत असेल, तर ते हलक्यात घेऊ नका. हे रूमेटाइड आर्थराइटिस सारख्या ऑटोइम्यून रोगाचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं, ऑटोइम्यून म्हणजेच ज्यात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच्या ऊतींवर हल्ला करते.
अशक्तपणा आणि सतत थकवा - कोणत्याही कारणाशिवाय सतत शारीरिक अशक्तपणा आणि थकवा येणं हे फॅटी लिव्हरचं लक्षण असू शकतं. यकृतामधे जास्त चरबी जमा झाल्यामुळे ते योग्यरित्या कार्य करू शकत नाही, ज्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याची आणि ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता कमी होते.
advertisement
डोकेदुखी आणि कोरडी त्वचा - थोडं डोकं दुखणं, चक्कर येणं, तोंड कोरडं होणं किंवा कोरडी त्वचा हे केवळ हवामानामुळेच नाही तर बऱ्याच काळच्या डिहायड्रेशनमुळेही होऊ शकतं. पुरेसे पाणी न प्यायल्यानं शरीराचे सर्व अवयव योग्यरित्या कार्य करू शकत नाहीत.
advertisement
सकाळी उठल्यावर चिंताग्रस्त वाटणं - चिंताग्रस्त, अस्वस्थ किंवा तणावग्रस्त वाटत असेल तर ते कॉर्टिसोल हार्मोनच्या असंतुलनामुळे असू शकतं. कॉर्टिसॉलला 'स्ट्रेस हार्मोन'म्हणजेच "तणाव संप्रेरक" म्हणून ओळखलं जातं. याच्या वाढलेल्या पातळीमुळे झोपेच्या पद्धतींत व्यत्यय येऊ शकतो आणि चिंता वाढू शकते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 12, 2025 8:33 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Warning Signs : शरीराच्या संकेतांकडे दुर्लक्ष नको, आरोग्याच्या समस्यांचे असू शकतात अलार्म










