Inadequate Sleep : अपुरी झोप विषासमान, वेळेवर झोपा, वेळेवर उठा, तब्येत चांगली ठेवा
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
शरीराची ही कामं पूर्ण झालीत नाही तर त्याचे परिणाम शरीरावर आणि मनावर होतात. कारण अपुरी झोप मंद विषासारखं काम करते. याचे तात्काळ परिणाम एकाग्रता कमी होणं, निर्णय घेण्याची क्षमता कमी होणं, मूड स्विंग होणं आणि प्रतिक्रियेचा वेळ कमी होणं या स्वरूपात दिसून येतात.
मुंबई : झोप म्हणजे शरीराचं रिसेट बटन. शरीराचा थकवा कमी करुन पुन्हा ऊर्जावान करण्यासाठी, शरीराच्या अंतर्गत दुरुस्तीसाठी झोप सगळ्यात महत्त्वाची.
शरीराची ही कामं पूर्ण झालीत नाही तर त्याचे परिणाम शरीरावर आणि मनावर होतात. कारण अपुरी झोप मंद विषासारखं काम करते. याचे तात्काळ परिणाम एकाग्रता कमी होणं, निर्णय घेण्याची क्षमता कमी होणं, मूड स्विंग होणं आणि प्रतिक्रियेचा वेळ कमी होणं या स्वरूपात दिसून येतात.
अपुऱ्या झोपेमुळे, अंतर्गत रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते आणि हार्मोनल संतुलन बिघडतं. यामुळे भविष्यात अल्झायमर, डिमेंशिया आणि स्ट्रोक सारख्या गंभीर आजारांचा धोका अनेक पटींनी वाढतो.
advertisement
सतत सहा तासांपेक्षा कमी झोपेमुळे हृदय आणि मेंदूचे धोके वाढतात. त्यामुळे प्रत्येकानं सात ते आठ तासांची झोप घेतली पाहिजे, जेणेकरून मेंदू पूर्ण क्षमतेनं कार्य करू शकेल आणि चयापचय संतुलित राहील.
कमी झोपल्यानं उत्पादकता वाढते असे काही जण मानतात, पण हे चुकीचं आहे. झोप हे शरीराचं रिसेट बटण आहे.
advertisement
कमी झोपेमुळे मेंदूतल्या विषारी पदार्थांचा योग्य पद्धतीनं निचरा होत नाही.
स्मरणशक्ती - अपुऱ्या झोपेमुळे प्रीफ्रंटल कॉर्टेक्सवर परिणाम होतो. विचार आणि निर्णय घेण्यावर परिणाम जाणवतो. स्मरणशक्ती आणि निर्णय घेण्याची क्षमता यामुळे कमकुवत होते.
हृदयविकाराचा धोका: कमी झोपणाऱ्यांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो.
advertisement
मूड स्विंग्स आणि ताण: सेरोटोनिन आणि डोपामाइनच पातळी विस्कळीत होते, ज्यामुळे चिंता आणि नैराश्य वाढतं.
कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती - कमी सायटोकिन्स तयार होतात, ज्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता वाढते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 12, 2025 12:22 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Inadequate Sleep : अपुरी झोप विषासमान, वेळेवर झोपा, वेळेवर उठा, तब्येत चांगली ठेवा