Hair Fall : हिवाळ्यात केस गळण्याचं प्रमाण का वाढतं ? जाणून घ्या कारणं, घरगुती उपाय करुन पाहा

Last Updated:

हिवाळ्यात गरम पाण्यानं वारंवार केस धुणं, जास्त स्टायलिंग आणि पोषणाचा अभाव यामुळे देखील केसांची गळती वाढते. म्हणूनच, हिवाळ्यात आपण आपल्या केसांची अतिरिक्त काळजी घेतली पाहिजे.

News18
News18
मुंबई : हिवाळ्यातल्या कोरड्या हवामानामुळे केस भरपूर गळतात. एरवी केस गळत असतील तर थंडीत हे प्रमाण झपाट्यानं वाढतं. कारण थंड आणि कोरड्या हवेमुळे टाळूतला ओलावा कमी होतो. यामुळे टाळू कोरडा होतो, ज्यामुळे कोंडा वाढतो, केसांची मुळं कमकुवत होतात आणि केस गळण्याचं प्रमाण वाढतं.
याव्यतिरिक्त, हिवाळ्यात गरम पाण्यानं वारंवार केस धुणं, जास्त स्टायलिंग आणि पोषणाचा अभाव यामुळे देखील केसांची गळती वाढते. म्हणूनच, हिवाळ्यात आपण आपल्या केसांची अतिरिक्त काळजी घेतली पाहिजे.
कांद्याचा रस - केस गळती रोखण्यासाठी कांद्याचा रस खूप उपयुक्त ठरू शकतो. कांद्याच्या रसात सल्फर असतं. यामुळे कोलेजनचं उत्पादन वाढवून नवीन केसांच्या वाढ चांगली होते. यामुळे केसांची मुळं मजबूत होतात. टाळूला कांद्याचा रस वीस-पंचवीस मिनिटं लावा आणि नंतर धुवा. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हे लावा.
advertisement
लोह आणि प्रथिनयुक्त पदार्थ - केसांची वाढ चांगली होण्यासाठी आणि केस तुटण्यापासून रोखण्यासाठी लोह आणि प्रथिनयुक्त पदार्थांचं योग्य सेवन केल्यानं हिवाळ्यात केस मजबूत होतील. पालक, मेथी आणि ब्रोकोली, मसूर, सोया यांसारखे लोहयुक्त पदार्थ, दैनंदिन आहारात पनीरसारखे प्रथिन स्रोत, बदाम आणि अक्रोडसारखे ओमेगा 3 पदार्थ, गाजर आणि बीट या भाज्या आणि तीळ गूळसारखे रक्त वाढवणाऱ्या पदार्थांमुळे मुळं मजबूत होतात आणि केस गळणं कमी होतं.
advertisement
हिवाळ्यात, आपण गरम पाण्यानं आंघोळ करतो पण जर केस कमकुवत असतील आणि खूप गळत असतील तर डोक्यावर गरम पाणी ओतणं टाळावं. गरम पाण्यामुळे केसांमधील ओलावा कमी होतो, ज्यामुळे ते कोरडे आणि निर्जीव होतात, ज्यामुळे टाळू कोरडा होतो आणि डोक्यातील कोंडा सारख्या बॅक्टेरियाच्या संसर्गाचा धोका असतो.
advertisement
नारळाचं दूध - नारळाच्या दुधामुळे केसांची चांगली वाढ होते. केसांच्या वाढीसाठी नारळाचं दूध खूप प्रभावी आहे. त्यात पुरेशा प्रमाणात लोह आणि पोटॅशियम असतं, यामुळे केस मजबूत होतात. नारळाचं दूध टाळूवर व्यवस्थित लावा. शक्य असेल तर नारळाच्या दुधात थोडं लिंबू पिळून घ्या, जेणेकरून केसांची वाढ आणि बळकटी होण्यास मदत होईल.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Hair Fall : हिवाळ्यात केस गळण्याचं प्रमाण का वाढतं ? जाणून घ्या कारणं, घरगुती उपाय करुन पाहा
Next Article
advertisement
Silver Price News: चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

View All
advertisement