Maruti ची SUV विकून टाका! Tata च्या नव्या SUV ने दिलं तब्बल 29.9 किमी रेकॉर्डब्रेक मायलेज!
- Published by:Sachin S
Last Updated:
Tata Sierra लाँच झाल्यापासून मार्केटमध्ये खळबळ उडवून दिली आहे. लूक, दमदार इंजिन आणि किंमतीमुळे Tata Sierra चा सगळीकडे बोलबाला आहे. अशातच टाटा मोटर्सने सलग 12तास Tata Sierra चालवली.
भारतातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी पैकी एक असलेल्या टाटा मोटर्सने अलीकडे आपली धाकड अशी Tata Sierra लाँच केली. Tata Sierra लाँच झाल्यापासून मार्केटमध्ये खळबळ उडवून दिली आहे. लूक, दमदार इंजिन आणि किंमतीमुळे Tata Sierra चा सगळीकडे बोलबाला आहे. अशातच टाटा मोटर्सने सलग १२ तास Tata Sierra चालवली.
advertisement
advertisement
टाटा मोटर्सकडून नव्याने लाँच केलेल्या Tata Sierra च्या वेगवेगळ्या चाचण्या घेतल्या जात आहे. अशातच इंदुरमध्ये NATRAX च्या ट्र्रॅकवर एक चाचणी घेण्यात आली. टाटाचं नवीन 1.5-लिटर Hyperion इंजिन असलेली Tata Sierra ला सलग कुठेही न ब्रेक घेता 12 तास चालवलं. यावेळी 29.9 किमी इतकं मायलेज दिल्याचं समोर आलं आहे. भारतात कोणत्याही SUV ने इतकं मायलेज देण्याची ही पहिलीच वेळ आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
Tata Sierra ची किंमत ही ११.४९ लाखांपासून सुरू होते तर टॉप मॉडेल हे १५.९९ लाखांपासून सुरू होईल ते १८.४९ लाखांपर्यंत आहे. Tata Sierra 2025 चं प्री बुकिंग सुरू झालं आहे, २१ हजारांमध्ये तुम्ही ही गाडी बूक करू शकतात. टाटाच्या अधिकृत डिलरशीप आणि ऑनलाईन सुरू होणार आहे. तर tata sierra ची डिलिव्हरी ही 16 जानेवारी २०२६ पासून सुरू होणार आहे.










