Friday OTT Releases : शुक्रवारी रिलीज होतायत एकापेक्षा एक भन्नाट फिल्म आणि सीरिज, वीकेंड होणार मजेदार

Last Updated:
Friday OTT Releases : 12 डिसेंबर 2025 रोजीच्या शुक्रवारी ओटीटीवर अनेक जबरदस्त फिल्म आणि सीरिज रिलीज होत आहेत. या सीरिज आणि फिल्म वीकेंड धमाकेदार करणार आहेत.
1/9
 F1: द मूव्ही (F1: The Movie) : ब्रॅड पिटचा स्पोर्ट्स ड्रामा 'F1 द मूव्ही' 1990 च्या दशकातील एका ट्रेंड रेस ड्रायव्हरभोवती फिरतो. एका भीषण अपघातानंतर त्याचे करिअर जवळजवळ संपुष्टात आले होते. पण पुढे काय होते हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना ही फिल्म पाहावी लागेल. या चित्रपटात जेव्हियर बार्डेम, केरी कोंडन आणि डॅमसन इड्रिस हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. आजपासून Apple TV+ वर प्रेक्षकांना ही फिल्म पाहता येईल.

advertisement
2/9
 थ्री रोजेस सीझन 2 (3 Roses Season 2) : 'थ्री रोजेस सीझन 2' या सीरिजमध्ये मुंबईतील तीन मैत्रिणींची गोष्ट दाखवण्यात आली आहे. ज्या एक अ‍ॅड एजन्सी सुरू करतात, पण फ्रान्समधून परतलेल्या एका धोकादायक गँगस्टरच्या चंगळात अडकतात. या सीरिजमध्ये ईशा रेब्बा, राशि सिंह आणि कुशिता कल्लापु हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. ही सीरिज 12 डिसेंबर, शुक्रवारपासून अहा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना पाहता येईल.

3/9
 कांथा (Kantha) : कांथा हा 2025 मध्ये रिलीज झालेला एक तमिळ पिरियड ड्रामा आहे. 1950 च्या दशकातील मद्रासमधील गोष्ट या फिल्ममध्ये दाखवण्यात आली आहे. हळूहळू ही गोष्ट एका हत्या-रहस्यात बदलते. ज्याची चौकशी इंस्पेक्टर (राणा दग्गुबती) करतो. 'कांथा' हा चित्रपट 12 डिसेंबरपासून नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होईल.

4/9
 साली मोहब्बत (Saali Mohabbat) : 'साली मोहब्बत' ही एक सस्पेन्स थ्रिलर फिल्म आहे. स्मिता (राधिका आपटे) नावाच्या एका छोट्या शहरातील गृहिणीच्या आयुष्याचा त्यात मागोवा घेतला आहे. तिचा नवरा आणि चुलत भावाचा मृतदेह सापडल्यावर तिच्या साध्या दिसणाऱ्या आयुष्याचे गुपित एकदम उघडे पडते आणि ती दुहेरी हत्याकांडाची मुख्य संशयित ठरते. या केसची चौकशी अधिकारी रतन पंडित (दिव्येंदू) करतो. टिस्का चोप्राने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. हा चित्रपट या शुक्रवारपासून Zee5 वर उपलब्ध असेल.

5/9
 सिंगल पापा (Single Papa) : 'सिंगल पापा'मध्ये कुणाल खेमूने गौरव गहलोतची भूमिका साकारली आहे घटस्फोटानंतर लगेच मुलाला दत्तक घेण्याचा निर्णय घेऊन तो कुटुंबाला आश्चर्यचकित करतो आणि मग त्याला एकट्यानेच मुलाची जबाबदारी सांभाळावी लागते. यात प्राजक्ता कोळी, मनोज पाहवा आणि आयशा रजा महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ही सीरिज या शुक्रवारपासून नेटफ्लिक्सवर पाहता येईल.

6/9
 द ग्रेट शम्सुद्दीन फॅमिली (The Great Shamsuddin Family) : 'द ग्रेट शम्सुद्दीन फॅमिली' ही एक मनोरंजक कॉमेडी सीरिज आहे. बानी अहमद नावाच्या एका तरुण लेखिकेच्या आयुष्याभोवती ही सीरिज फिरते. अनुषा रिजवी दिग्दर्शित या सीरिजमध्ये कृतिका कामरा, श्रेया धनवंतरी, शीबा चड्ढा आणि फरीदा जलाल यांच्या भूमिका आहेत. कथेचा केंद्रबिंदू बानी आहे, जिला कुटुंब तुटत असताना एक महत्त्वाची डेडलाइन पूर्ण करायची असते आणि तिला काम व कुटुंबातील गोंधळ यांच्यात समतोल साधावा लागतो. ही सीरिज जिओ हॉटस्टारवर या शुक्रवारपासून उपलब्ध असेल.

7/9
 वेक अप डेड मॅन: अ नाइफ्स आऊट मिस्ट्री (Wake Up Dead Man: A Knives Out Mystery) : 'वेक अप डेड मॅन: अ नाइफ्स आऊट मिस्ट्री' या चित्रपटात डिटेक्टिव्ह बेनोइट ब्लाँक न्यूयॉर्कमधील एका धार्मिक समुदायातील करिष्माई पादरी मॉन्सिग्नोर जेफरसन विक्स (जोश ब्रोलिन) यांच्या बंद खोलीतील हत्येचा तपास करत असलेलं पाहायला मिळेल. हा रोमांचकारी रहस्यपट या शुक्रवारपासून नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांना पाहता येईल.

8/9
 टेलर स्विफ्ट: द एराज टूर - द फायनल शो (Taylor Swift: The Eras Tour – The Final Show) : 'टेलर स्विफ्ट: द एराज टूर' ही एक कॉन्सर्ट फिल्म आहे. ज्यामध्ये The End of an Era या 6-भागांच्या डॉक्युमेंटरी सीरिजचाही समावेश आहे. पहिले दोन भाग 12 डिसेंबरला जिओ हॉटस्टारवर उपलब्ध होतील. त्यानंतर 26 डिसेंबरपर्यंत दर आठवड्याला दोन एपिसोड रिलीज केले जातील.

9/9
 सिटी ऑफ शॅडोज (City of Shadows) : आरो सैंझ दे ला माजा यांच्या कादंबरीवर आधारित City of Shadows ही सहा-एपिसोडची स्पॅनिश क्राईम थ्रिलर मिनी-सीरिज आहे. यात बदनाम डिटेक्टिव्ह मिलो मलार्टची कथा दाखवण्यात आली आहे. ही सीरिज 12 डिसेंबरपासून प्रेक्षकांना नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल.

IAS Santosh Varma: ब्राह्मण मुलीचा विवाह...IAS संतोष वर्मांवर कारवाई, सरकारने पदावरून हटवले, समोर आलं धक्कादायक कारण
ब्राह्मण मुलीचा विवाह...IAS संतोष वर्मांवर कारवाई, सरकारने पदावरून हटवले, समोर आ
  • ब्राह्मण मुलीचा विवाह...IAS संतोष वर्मांवर कारवाई, सरकारने पदावरून हटवले, समोर आ

View All
advertisement