तहसीलदाराच्या टेबलावर पैशाचा पाऊस, शेतकऱ्याच्या ‘त्या’ कृतीने खळबळ, जालन्यात काय घडलं? Video
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
Jalna News: शेतकऱ्याने नायब तहसीलदारांच्या टेबलावर 50 हजारांच्या नोटा उधळल्या. जालन्यातील घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
जालना: महसूल विभागातील भ्रष्टाचाराच्या चर्चा नेहमीच होत असतात. आता जालन्यातून एक वेगळाच प्रकार पुढे आला आहे. एका शेतकऱ्याने चक्क नायब तहसीलदाराच्या टेबलावर 50 हजार रुपये उधळले आहेत. शेतरस्त्याच्या वादात तहसीलदारांनी रोख रक्कम मागितल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे. तर नायब तहसीलदार तायडे यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. हे प्रकरण नक्की काय? याबाबत लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
हलदोला येथील श्रीहरी मात्रे आणि जनार्दन मात्रे यांची शेतजमीन आहे. शेतजमिनीच्या रस्त्याबाबत त्यांचा शेजाऱ्यांशी वाद आहे. त्यांनी यासंदर्भात तहसील कार्यालयात अर्ज केले. यासंदर्भात नायब तहसीलदार हेमंत तायडे आणि अतुल बने यांनी पंचनामादेखील केला. मात्र, रस्त्याचा प्रश्न सुटला नाही.
advertisement
शेतकऱ्याचा आरोप
रस्ता देण्यासाठी नायब तहसीलदार तायडे यांनी पैशांची मागणी केल्याचा आरोप शेतकरी मात्रे यांनी केला. शिवाय या महसूल प्रशासनाच्या अन्यायकारक भूमिकेमुळे त्यांच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. एकूणच अधिकारी पैशांची मागणी करीत असल्याने संतप्त होऊन मंगळवारी त्यांनी बदनापूर तहसील कार्यालयात तायडे यांच्या दालनातील टेबलवर पैशांची उधळण केली.
advertisement
काय म्हणाले नायब तहसीलदार?
view comments“मी स्वतःच्या स्वाक्षरीने रस्ता देण्याबाबत आदेश दिले होते. मात्र, विरोधी पक्षकाराने जालना येथील उपविभागीय अधिकाऱ्यांकडे फेरयाचिका दाखल केली होती. त्यात मी दिलेला आदेश रद्द करून फेरचौकशीचा आदेश देण्यात आला. मी पैशांची मागणी केली असेल, तर त्यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार करावी. त्यांनी जाणीवपूर्वक माझ्या टेबलवर नोटा टाकल्या आहेत,” असे नायब तहसीलदार हेमंत तायडे यांनी सांगितले.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
December 12, 2025 11:51 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
तहसीलदाराच्या टेबलावर पैशाचा पाऊस, शेतकऱ्याच्या ‘त्या’ कृतीने खळबळ, जालन्यात काय घडलं? Video





