Krushi Market Today: कांद्याची आवक वाढली, पण दर घसरतेच; सोयाबीन आणि मक्याचे दर किती?
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
12 डिसेंबर रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये गुरुवारच्या तुलनेत आवक कमी झाली. तसेच बाजार भावातही चढ उतार दिसून येत आहे. जाणून घेऊ, सोयाबीन, मका आणि कांद्याला किती मिळाला दर?
राज्यातील कृषी मार्केटमध्ये आज सोयाबीनचे सर्वाधिक दर स्थिर असल्याचे दिसून येत आहे. तसेच इतरही शेतमालाच्या दरांत फारसा बदल झालेला नाही. 12 डिसेंबर शुक्रवार रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये शेतमालाची आवक गुरुवारच्या तुलनेत कमी झालेली दिसून येत आहे. त्यातील सोयाबीन, कांदा आणि मका या महत्त्वाच्या तीन शेतमालांची आवक आज कृषी मार्केटमध्ये आज किती राहिली? आणि दरकिती मिळाला? पाहुयात
मक्याची आवक कमी सर्वाधिक दर आजही स्थिर: कृषी मार्केट वेबसाईटवरील सायंकाळी 6.30 वाजताच्या रिपोर्ट नुसार, 12 डिसेंबर रोजी राज्याच्या कृषीमार्केटमध्ये मक्याची एकूण आवक 12 हजार 195 क्विंटल इतकी झाली. सर्वाधिक आवक नाशिकमार्केटमध्ये झाली. नाशिक मार्केटमधील 7 हजार 146 क्विंटल मक्यास प्रतीनुसार 1493 ते 2180 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये आवक झालेल्या 787 क्विंटल मक्यास कमीत कमी 2500 ते 3800 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला. गुरुवारच्या तुलनेत मक्याच्या सर्वाधिक दरात कुठलाही बदल झालेला नाही. मात्र, इतर दरात चढ उतार बघायला मिळत आहे.
advertisement
कांद्याच्या दरात घट: राज्याच्या कृषी मार्केटमध्ये आज कांद्याची एकूण आवक 1 लाख 19 हजार 186 क्विंटल इतकी झाल्याची नोंद आहे. त्यातील 29 हजार 883 क्विंटल उन्हाळी कांद्याची सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 484 ते 2270 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच नाशिक मार्केटमध्ये आवक झालेल्या 6386 क्विंटल लाल कांद्यास 483 ते 3838 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला. गुरुवारी मिळालेल्या सर्वाधिक दराच्या तुलनेत कांद्याच्या दरात काहीशी घट दिसून येत आहे. तर इतर दरात वाढ झालेली दिसून येत आहे.
advertisement
सोयाबीनचे दर स्थिर: राज्याच्या मार्केटमध्ये आज सोयाबीनची एकूण आवक 30 हजार 662 क्विंटल इतकी झाली. सर्वाधिक आवक ही वाशिम मार्केटमध्ये झाली. वाशिम मार्केटमधील 7 हजार क्विंटल सोयाबीनला 4135 ते 4460 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. सातारा मार्केटमध्ये आवक झालेल्या 139 क्विंटल सोयाबीनला 5328 रुपये इतका सर्वाधिक बाजारभाव मिळाला. गुरुवारी मिळालेल्या सर्वाधिक बाजार भावात कुठलाही बदल झालेला नाही.
view commentsLocation :
Maharashtra
First Published :
December 12, 2025 8:35 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Krushi Market Today: कांद्याची आवक वाढली, पण दर घसरतेच; सोयाबीन आणि मक्याचे दर किती?








