Hair Care : केसांसाठी खास आयुर्वेदिक तेल, हिवाळ्याच्या गार आणि कोरड्या हवेतही केस होतील मजबूत, दाट
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
केसांची वाढ आणि केसांच्या मजबुतीसाठी खास हिवाळ्यातील तेल वापरून पहा. यामुळे केस चमकदार होतील. हे बनवण्यासाठी कृती पारंपरिक आणि आयुर्वेदिक घटकांवर आधारित आहे. या तेलामुळे मुळांपासून टोकापर्यंत केसांना पोषण मिळतं.
मुंबई : हिवाळ्यात थंड आणि कोरड्या हवेमुळे केस कोरडे होतात, तुटतात. टाळू कोरडा झाल्यानं गळण्याचं प्रमाण वाढतं. यासाठी केसांची विशेष काळजी घेणं आवश्यक असतं. थंडीमुळे केस कोरडे, निर्जीव आणि ठिसूळ होऊ शकतात. या ऋतूत तेल लावणं हा चांगला पर्याय आहे. कारण याद्वारे त्वचा आणि केस पोषक घटक अधिक सहजपणे शोषून घेतात.
केसांची वाढ आणि केसांच्या मजबुतीसाठी खास हिवाळ्यातील तेल वापरून पहा. यामुळे केस चमकदार होतील. हे बनवण्यासाठी कृती पारंपरिक आणि आयुर्वेदिक घटकांवर आधारित आहे. या तेलामुळे मुळांपासून टोकापर्यंत केसांना पोषण मिळतं.
आयुर्वेदिक तेल बनवण्यासाठीचे घटक आणि त्याचं महत्त्व समजून घेऊया.
advertisement
नारळ तेल - या तेलामुळे केसांना खोलवर पोषण मिळतं, केस मॉइश्चरायझ राहतात आणि प्रोटिन लॉस कमी होतो.
मोहरीचं तेल - मोहरीच्या तेलामुळे रक्ताभिसरण वाढतं, ज्यामुळे केसांचे कूप - फॉलिकल्स मजबूत होतात आणि नवीन केसांची वाढ होते.
एरंडेल तेल - एरंडेल तेलात रिसिनोलिक अॅसिड असतं, यामुळे केसांची चांगली वाढ होते आणि केस जाड होतात.
advertisement
आवळा - आवळ्यात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. आवळ्यामुळे केस काळे, मजबूत होतात आणि चमकदार राहतात.
कढीपत्ता - कढीपत्त्यामुळे केस गळती थांबते आणि केस अकाली पांढरे होण्याचं प्रमाण कमी होतं.
कांदे - कांद्यातल्या सल्फरमुळे रक्ताभिसरण वाढतं आणि केसांचे कूप पुनरुज्जीवित होतात.
मेथीचे दाणे - मेथीच्या दाण्यांमधे प्रथिनं आणि निकोटिनिक आम्ल असतं. यामुळे केस मजबूत होतात आणि कोंडा दूर होतो.
advertisement
कलौंजी - कलौंजीमधे असलेल्या अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांमुळे टाळूला संसर्ग होण्याचं प्रमाण कमी होतं.
तेल बनवण्यासाठी, एका स्वच्छ भांड्यात शंभर मिलीलीटर नारळ तेल, पन्नास मिली मोहरीचे तेल आणि पन्नास मिली एरंडेल तेल गरम करा. त्यात दोन चमचे मेथीचे दाणे, एक चमचा कलौंजी, कढीपत्त्याची दहा - बारा पानं आणि एक बारीक चिरलेला छोटा कांदा घाला.
advertisement
कांदे हलके सोनेरी होईपर्यंत मंद आचेवर उकळू द्या. नंतर दोन चमचे वाळलेल्या आवळ्याची पावडर घाला आणि आणखी दोन मिनिटं उकळवा. मिश्रण थंड होऊ द्या आणि नंतर ते स्वच्छ बाटलीत गाळून घ्या. हे तेल थंड जागी ठेवा.
आठवड्यातून दोन-तीन वेळा हे तेल लावा. झोपण्यापूर्वी टाळूला हलक्या हातानं मसाज करा आणि नंतर ते संपूर्ण केसांवर लावा. सकाळी कोमट पाण्यानं आणि सौम्य शाम्पूनं केस धुवा. या तेलाच्या नियमित वापरानं, एका महिन्यात फरक दिसेल.
advertisement
केसांची वाढ वेगानं होईल, केस मजबूत आणि दाट होतील. टाळू संवेदनशील असेल किंवा काही तेलांची अॅलर्जी असेल, तर प्रथम पॅच टेस्ट करा. गरम तेल थेट तुमच्या टाळूला लावू नका; ते थंड झाल्यानंतरच वापरा.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 12, 2025 7:38 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Hair Care : केसांसाठी खास आयुर्वेदिक तेल, हिवाळ्याच्या गार आणि कोरड्या हवेतही केस होतील मजबूत, दाट











