स्कायडायव्हर 15 हजार फूटावर खाली पडला, विमानाच्या विंगमध्ये अडकला; मृत्यूच्या दाढेतून कसे मिळाले जीवदान Video
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Skydiver Video: ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडमध्ये स्कायडायव्हिंगदरम्यान एक थरारक घटना घडली. ज्यात स्कायडायव्हरचा इमर्जन्सी पॅराशूट विमानाच्या विंगमध्ये अडकला. 15 हजार फूट उंचीवर हवेत लटकलेल्या स्कायडायव्हरने धैर्याने 11 दोऱ्या कापून आपला जीव वाचवला.
क्वीन्सलँड: ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडमध्ये स्कायडायव्हिंग करताना एक अतिशय थरारक आणि धोकादायक घटना घडली. सुमारे 15 हजार फूट उंचीवरून उडी मारण्याच्या तयारीत असताना एका स्कायडायव्हरचा इमर्जन्सी (रिझर्व्ह) पॅराशूट अचानक उघडला आणि तो थेट विमानाच्या मागील विंगमध्ये अडकला. ही घटना स्कायडायव्हर विमानातून उडी मारण्याच्या काही सेकंद आधी घडली.
advertisement
ऑस्ट्रेलियाच्या ट्रान्सपोर्ट सेफ्टी एजन्सीने या घटनेचा व्हिडिओ जाहीर केला आहे. या व्हिडिओमध्ये स्कायडायव्हर बराच वेळ हवेत विमानाला लटकलेला दिसतो. जीव वाचवण्यासाठी त्याने मोठ्या धैर्याने आपल्या पॅराशूटच्या 11 दोऱ्या कापल्या आणि स्वतःला मोकळे केले. त्यानंतर त्याने मुख्य पॅराशूट उघडून सुरक्षित लँडिंग केली. ही घटना 20 सप्टेंबर रोजी घडली होती, मात्र तिचा व्हिडिओ आता समोर आला आहे.
advertisement
या घटनेत संबंधित स्कायडायव्हरला किरकोळ दुखापत झाली. ट्रान्सपोर्ट सेफ्टी एजन्सीच्या अहवालात या स्कायडायव्हरला ‘P1’ असे नाव देण्यात आले आहे. त्याच्याकडे असलेल्या ‘हुक नाइफ’ या खास चाकूच्या मदतीने त्याने स्वतःला वाचवले. थोड्या जखमा होऊनही तो सुखरूप खाली उतरू शकला.
advertisement
ही घटना ‘मिड वेज अॅट द बीच’ या कार्यक्रमादरम्यान घडली. या स्टंटमध्ये 16 स्कायडायव्हरांना 15 हजार फूट उंचीवरून उडी मारायची होती आणि हवेत एकमेकांचे हात धरून साखळी तयार करायची होती. संपूर्ण कार्यक्रम एक पॅराशूटिंग कॅमेरा ऑपरेटर शूट करत होता. मात्र पहिलाच स्कायडायव्हर विमानाबाहेर पडताच काही सेकंदांतच सगळा प्लॅन बिघडला.
advertisement
या घटनेच्यावेळी विमानात एकूण 17 स्कायडायव्हर होते. P1 जेव्हा उडी मारण्यासाठी पुढे सरकला, तेव्हा त्याच्या रिझर्व्ह पॅराशूटचा हँडल विमानाच्या विंग फ्लॅपमध्ये अडकला. त्यामुळे पॅराशूट तात्काळ उघडला आणि जोरदार वाऱ्यामुळे मागच्या बाजूला ओढला गेला. यामुळे जवळ बसलेल्या दुसऱ्या स्कायडायव्हरचा तोल गेला आणि तो खाली पडला. नारंगी रंगाचा पॅराशूट विमानाच्या शेपटीला अडकला आणि P1 खाली हवेत लटकत राहिला.
advertisement
A skydiver in Queensland Australia was left dangling thousands of metres in the air after their parachute caught on the plane’s tail.
The dramatic footage was released by the Australian Transport Safety Bureau following an investigation into the incident. pic.twitter.com/ntXU6d8pAQ
— Channel 4 News (@Channel4News) December 11, 2025
advertisement
या सगळ्या प्रकारामुळे विमानाचा वेग कमी झाला आणि पायलटला विमान वर उचलले जात असल्याचे जाणवले. पायलटने तातडीने ‘मेडे कॉल’ दिला आणि परिस्थिती गंभीर असल्याने स्वतःही उडी मारण्याची तयारी केली. मात्र नंतर त्याला कळले की एक स्कायडायव्हर विमानात अडकलेला आहे. त्यामुळे त्याने इंजिनची शक्ती कमी करून विमान नियंत्रणात ठेवले.
परिस्थिती अत्यंत धोकादायक होती. विमान कोसळण्याची भीती असल्याने पायलट पूर्ण लक्ष देऊन विमान सांभाळत राहिला. दरम्यान क्रूतील एका सदस्याने सुरक्षिततेसाठी उरलेल्या स्कायडायव्हरांना उडी मारण्यास सांगितले. 13 जणांनी तात्काळ उडी मारली, तर 2 जण थांबून P1 स्वतःला कसे वाचवतोय हे पाहत होते.
दरम्यान P1 ने हुक नाइफने पॅराशूटच्या एकामागून एक 11 दोऱ्या कापल्या. त्याला हे करण्यासाठी सुमारे 1 मिनिट लागला. अखेर उरलेले दोन स्कायडायव्हरही उडी मारल्यानंतर पायलटने मागे पाहिले असता, पॅराशूटचे तुकडे विमानाच्या शेपटीला अडकलेले दिसले आणि स्टॅबिलायझरचा पुढचा भागही खराब झाला होता.
पायलटने रेडिओवर सांगितले की परिस्थिती अधिक बिघडली तर तोही पॅराशूटने उडी मारण्यास तयार आहे. मात्र सुदैवाने तसे करावे लागले नाही. पायलटने विमान क्वीन्सलँडमधील टली विमानतळावर सुरक्षित उतरवले.
या घटनेनंतर नॉर्थ फ्री-फॉल क्लबने आपल्या सुरक्षा नियमांमध्ये बदल केले आहेत. आता सर्व स्कायडायव्हरांसाठी हुक नाइफ घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. भविष्यातील प्रशिक्षणासाठी हा व्हिडिओ दाखवला जाणार आहे.
जगप्रसिद्ध स्कायडायव्हर डॅन ब्रोड्स्की-चेनफेल्ड यांनी CNN ला सांगितले की, अशा घटनांबद्दल त्यांनी ऐकले होते; पण पॅराशूट थेट विमानात अडकलेले त्यांनी कधीच पाहिले नव्हते. या घटनेतील वेगळेपण म्हणजे मुख्य पॅराशूट नाही, तर रिझर्व्ह पॅराशूट उघडला होता. रिझर्व्ह पॅराशूट वेगळे करता येत नसल्याने अशा प्रसंगी दोऱ्या कापणे हाच एकमेव पर्याय असतो.
ऑस्ट्रेलियन सरकारनेही या घटनेनंतर पॅराशूटच्या हँडल बाबत जागरूक राहण्याचा आणि विमानातून बाहेर पडताना अधिक काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 12, 2025 7:33 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
स्कायडायव्हर 15 हजार फूटावर खाली पडला, विमानाच्या विंगमध्ये अडकला; मृत्यूच्या दाढेतून कसे मिळाले जीवदान Video











