'माझ्या पोटात गोळा यायचा', रेणुका शहाणेंनंतर मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला काजोलसोबत काम करण्याचा अनुभव

Last Updated:
Ajay Devgan-Kajol: मराठी मालिकांमध्ये लोकप्रिय असलेल्या अभिनेत्रीने हिंदी चित्रपटसृष्टीतील कामाच्या विशेषतः अजय देवगण आणि काजोलसोबत काम करतानाचा अनुभव सांगितला.
1/9
मुंबई: 'होणार सून मी ह्या घरची' मालिकेतील भूमिकेमुळे आजही घराघरांत पोहोचलेल्या अभिनेत्री पूर्णिमा तळवलकर सध्या 'तुला जपणार आहे' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
मुंबई: 'होणार सून मी ह्या घरची' मालिकेतील भूमिकेमुळे आजही घराघरांत पोहोचलेल्या अभिनेत्री पूर्णिमा तळवलकर सध्या 'तुला जपणार आहे' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
advertisement
2/9
मराठी मालिकांमध्ये लोकप्रिय असलेल्या पूर्णिमा यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील कामाच्या अनुभवाबद्दल नुकताच एक रंजक खुलासा केला आहे. विशेषतः अजय देवगण आणि काजोलसोबत काम करतानाचा अनुभव त्यांनी सांगितला.

3/9
पूर्णिमा तळवलकर यांनी अजय देवगण आणि काजोल यांच्या १९९८ मध्ये आलेल्या 'प्यार तो होना ही था' या सुपरहिट चित्रपटात काम केले होते. यात त्यांनी अजय देवगणच्या बहिणीची भूमिका साकारली होती.
पूर्णिमा तळवलकर यांनी अजय देवगण आणि काजोल यांच्या १९९८ मध्ये आलेल्या 'प्यार तो होना ही था' या सुपरहिट चित्रपटात काम केले होते. यात त्यांनी अजय देवगणच्या बहिणीची भूमिका साकारली होती.
advertisement
4/9
'टेली गप्पा'ला दिलेल्या मुलाखतीत पूर्णिमा म्हणाल्या,
'टेली गप्पा'ला दिलेल्या मुलाखतीत पूर्णिमा म्हणाल्या, "मी आयुष्यात पहिल्यांदाच चित्रपटात काम करत होते आणि तेव्हा मी केवळ २०-२२ वर्षांची होते. मेहबूब स्टुडिओमध्ये शूट सुरू होते. एकाच कपड्यांवर आम्ही तब्बल सात दिवस शूटिंग करत होतो आणि आम्हाला खूप कंटाळा आला होता."
advertisement
5/9
सेटवरील वातावरण आणि कामाची पद्धत मराठी इंडस्ट्रीपेक्षा खूप वेगळी होती, असे पूर्णिमा यांनी सांगितले. त्या म्हणाल्या,
सेटवरील वातावरण आणि कामाची पद्धत मराठी इंडस्ट्रीपेक्षा खूप वेगळी होती, असे पूर्णिमा यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, "हिंदी इंडस्ट्रीत ओळख असेल तरच लोक एकमेकांशी बोलतात. व्हॅनिटी व्हॅनचा जमाना असल्याने प्रत्येकाला वेगळी व्हॅनिटी असायची. त्यामुळे कोणाशीही बोलणे व्हायचे नाही."
advertisement
6/9
 "समोरच्या कलाकारांना ओळखत नसल्यामुळे मला काम जमेल की नाही, याची नेहमी भीती वाटायची आणि माझ्या पोटात गोळा यायचा," असे त्यांनी सांगितले.
"समोरच्या कलाकारांना ओळखत नसल्यामुळे मला काम जमेल की नाही, याची नेहमी भीती वाटायची आणि माझ्या पोटात गोळा यायचा," असे त्यांनी सांगितले.
advertisement
7/9
पूर्णिमा आणि अजय देवगणची भेट चित्रपटात बहिण-भावाची भूमिका असूनही फारशी झाली नाही.
पूर्णिमा आणि अजय देवगणची भेट चित्रपटात बहिण-भावाची भूमिका असूनही फारशी झाली नाही. "शॉट झाला की सगळे आपापल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये जायचे. अजय देवगणसोबत अजिबातच ओळख झाली नाही किंवा कोणतीही आठवण नाही," असे पूर्णिमा यांनी स्पष्ट केले.
advertisement
8/9
मात्र, चंदीगडमध्ये ११ दिवसांच्या शूटिंग दरम्यान वातावरण थोडे बदलले. काजोल आणि मुख्य कलाकार वेगळे बसायचे, पण रीमा लागू यांच्यासोबत छोट्या भूमिका करणारे कलाकार एकत्र बसायचे.
मात्र, चंदीगडमध्ये ११ दिवसांच्या शूटिंग दरम्यान वातावरण थोडे बदलले. काजोल आणि मुख्य कलाकार वेगळे बसायचे, पण रीमा लागू यांच्यासोबत छोट्या भूमिका करणारे कलाकार एकत्र बसायचे. "आम्ही सगळे गप्पा मारायचो, आमचे छान कुटुंबासारखे बाँडिंग झाले होते," असे पूर्णिमा म्हणाल्या.
advertisement
9/9
मराठी इंडस्ट्रीत काम करणे जास्त आवडते, कारण इथले वातावरण खूप वेगळे आणि आपलेसे वाटते, असेही त्यांनी मुलाखतीत सांगितले.
मराठी इंडस्ट्रीत काम करणे जास्त आवडते, कारण इथले वातावरण खूप वेगळे आणि आपलेसे वाटते, असेही त्यांनी मुलाखतीत सांगितले.
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement