advertisement

HSRP नंबर प्लेटचा नवीन Scam; 4 लाखांच्या मुद्देमालासह चक्क कारखानाच जप्त, पोलिसांची मोठी कारवाई

Last Updated:
1/8
आजच्या काळात रस्ते सुरक्षा आणि वाहनांची चोरी रोखण्यासाठी सरकारने HSRP (High-Security Registration Plate) म्हणजेच हाय-सिक्युरिटी नंबर प्लेट अनिवार्य केली आहे. ही प्लेट केवळ अधिकृत विक्रेत्यांकडेच मिळते आणि तिचा मुख्य उद्देश म्हणजे वाहनाला एक वेगळी ओळख देणे आणि सुरक्षितता वाढवणे हा असतो. मात्र, याच हाय-सिक्युरिटी नंबर प्लेटच्या नावाखाली सर्वसामान्यांची फसवणूक होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

2/8
कोल्हापूर जिल्ह्यात चक्क बनावट नंबर प्लेट तयार करण्याचा कारखानाच सुरू असल्याचे उघड झाले असून, यामुळे वाहनधारकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

3/8
नेमकी घटना काय?कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे शाखेला एका गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती की, हातकणंगले तालुक्यातील साजणी गावात बनावट नंबर प्लेट तयार करण्याचा काळाबाजार सुरू आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून साजणी गावातील एका घरावर छापा टाकला.

4/8
या छाप्यात संतोष यादव नावाच्या व्यक्तीने आपल्या राहत्या घरीच चक्क बनावट नंबर प्लेट बनवण्याचे युनिट सुरू केल्याचे दिसून आले. तो हुबेहूब ओरिजिनल दिसतील अशा बनावट 'अँकर HSRP' नंबर प्लेट तयार करत होता. पोलिसांनी या कारवाईत सुमारे 4 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, यामध्ये नंबर प्लेट बनवण्याचे मशिनरी आणि इतर साहित्याचा समावेश आहे.

5/8
HSRP नंबर प्लेटवर एक विशेष 'चक्र' आणि 'लेझर कोड' असतो, जो सरकारकडे नोंदणीकृत असतो. आरोपी संतोष यादव हा आधुनिक मशिनरींचा वापर करून हुबेहूब अशाच प्लेट्स बनवत होता. लोक एजंटवर विश्वास ठेवून किंवा स्वस्त दरात काम होतेय म्हणून अशा अनधिकृत ठिकाणाहून प्लेट बनवून घेतात. मात्र, या प्लेट्स अधिकृत डेटाबेसमध्ये नोंदणीकृत नसतात, ज्यामुळे भविष्यात वाहन मालकाला कायदेशीर संकटाचा सामना करावा लागू शकतो.

6/8
ओरिजिनल HSRP कशी ओळखावी?1. होलोग्राम: प्लेटच्या डाव्या बाजूला निळ्या रंगाचा 'IND' लिहिलेला क्रोमियम होलोग्राम असतो.
2. लेझर कोड: प्रत्येक प्लेटवर 10 अंकी लेझर आयडेंटिफिकेशन नंबर असतो.
3. रिवेट्स: ही प्लेट गाडीला लावताना अशा प्रकारे लॉक केली जाते की ती पुन्हा काढता येत नाही.
ओरिजिनल HSRP कशी ओळखावी?1. होलोग्राम: प्लेटच्या डाव्या बाजूला निळ्या रंगाचा 'IND' लिहिलेला क्रोमियम होलोग्राम असतो.2. लेझर कोड: प्रत्येक प्लेटवर 10 अंकी लेझर आयडेंटिफिकेशन नंबर असतो.3. रिवेट्स: ही प्लेट गाडीला लावताना अशा प्रकारे लॉक केली जाते की ती पुन्हा काढता येत नाही.
advertisement
7/8
वाहनधारकांसाठी महत्त्वाचा सल्लाजर तुम्ही तुमची नंबर प्लेट कोणत्याही स्थानिक दुकानातून किंवा अनधिकृत एजंटकडून बनवून घेतली असेल, तर ती बनावट असू शकते. बनावट नंबर प्लेट लावणे हा गुन्हा असून, पोलीस तपासणीत किंवा अपघाताच्या वेळी तुमची गाडी 'अनधिकृत' ठरू शकते. त्यामुळे नेहमी अधिकृत आरटीओ (RTO) पोर्टलवरून किंवा शोरूममधूनच आपली नंबर प्लेट बुक करा.

8/8
कोल्हापूर पोलिसांनी केलेली ही कामगिरी वाहन चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. मात्र, नागरिकांनीही सावध राहून अशा भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement