Ghanshyam Darode: सूरजनंतर घनश्याम चढणार बोहल्यावर, कोण आहे छोटा पुढारीची होणारी बायको? थेट हात जोडत म्हणाला...
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Chhota Pudhari Wedding: 'बिग बॉस मराठी' जिंकलेल्या सूरज चव्हाणने लग्नगाठ बांधताच, घनश्याम दरोडेचाही हळद लागल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.
मुंबई: महाराष्ट्राचा सोशल मीडिया गाजवणारा 'छोटा पुढारी' म्हणून ओळखला जाणारा घनश्याम दरोडे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 'बिग बॉस मराठी' जिंकलेल्या सूरज चव्हाणने लग्नगाठ बांधताच, घनश्याम दरोडेचाही हळद लागल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी 'सूरज पाठोपाठ घनश्यामही सेटल झाला!' म्हणत कमेंट्स आणि अभिनंदनाचा वर्षाव सुरू केला.
अनेकांनी तर त्याला फोन करून "वहिनी कोण?" किंवा "लग्नाची तारीख काय?" असे प्रश्न विचारून हैराण केले. पण आता अखेर घनश्याम दरोडेने स्वतः एका व्हिडिओद्वारे या अफवांवर पूर्णविराम दिला आहे आणि आपली बाजू स्पष्ट केली आहे.
मला सेटल व्हायचंय, पण...
व्हायरल झालेल्या व्हिडिओवर खुलासा करताना घनश्यामने सुरुवातीलाच हात जोडले. तो म्हणाला, "दोन-तीन दिवसांपूर्वी जो हळदीचा व्हिडिओ मी टाकला, त्यावर अनेकांनी कमेंट करून आणि फोन करून विचारणा केली. यामुळे मी खूप हैराण झालो आहे. हा व्हिडिओ माझ्या लग्नाचा नाही, तो एका प्रमोशनचा भाग होता!"
advertisement
घनश्यामने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची इच्छा व्यक्त करताना सांगितले, "मला अजून सेटल व्हायचं आहे. मी लग्नासाठी मुलगी बघतोय. पण मुलगी स्वभावाने चांगली असावी आणि कुटुंब सांभाळणारी असावी, अशी माझी अपेक्षा आहे. मला ती मुलगी अजून सापडलेली नाही."
advertisement
लवकरच वहिनी आणू!
घनश्यामने आपल्या लग्नाची जबाबदारी आई-वडिलांवर सोपवली आहे. तो म्हणाला, "माझं अजून लग्न जमलेलं नाही, आई-वडिलांच्या मनावरती माझं लग्न आहे. पण काळजी करू नका, आपण तुमच्यासाठी लवकरच वहिनी आणू."
advertisement
या अफवांमुळे आपल्याला होणारा त्रास पाहून त्याने चाहत्यांना थेट आवाहन केले. तो म्हणाला, "माझी सर्वांना विनंती आहे की, मी टाकलेला व्हिडिओ प्रमोशनसाठी केलेला होता. माझं लगीन वगैरे जमलेलं नाही, पण लवकरच जमवूया! पण कृपया अफवा पसरवू नका की घनश्यामचं लग्न जमलं, घनश्याम बोहल्यावर चढला!"
एका गोड विनंतीसह त्याने आपली 'रिक्वायरमेंट'ही सांगितली. "जर तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये तशी मुलगी असेल, तर कळवा, काही अडचण नाही," असे म्हणत त्याने चाहत्यांना हसवले.
advertisement
नगर जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबातून आलेला, गरीब परिस्थितीतून संघर्ष करत 'छोटा पुढारी' बनलेला घनश्याम दरोडे, 'बिग बॉस मराठी सीझन ५' मधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला होता. त्याने बेरोजगारी आणि भ्रष्टाचार यांसारख्या विषयांवर स्पष्ट मते मांडली आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 12, 2025 7:39 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Ghanshyam Darode: सूरजनंतर घनश्याम चढणार बोहल्यावर, कोण आहे छोटा पुढारीची होणारी बायको? थेट हात जोडत म्हणाला...











