'ही' कंपनी देतेय फक्त 399 रुपयांत 3300GB डेटा! 60Mbps मिळेल स्पीड
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
BSNL Broadband Plan: बीएसएनएलने त्यांच्या 60Mbps Broadband Planची किंमत कमी केली आहे. या बीएसएनएल ऑफरचा फायदा तुम्ही कसा घेऊ शकता, या प्लॅनची किंमत किती आहे आणि ऑफर अंतर्गत तुम्हाला कोणते फायदे मिळतील ते आपण पाहूया. नवीन ऑफरची माहिती Xवरील एका पोस्टद्वारे शेअर करण्यात आली आहे.
advertisement
advertisement
एक्सवरील शेअर केलेल्या पोस्टनुसार, ग्राहकांना तीन महिन्यांसाठी दरमहा 100 रुपयांची सूट मिळेल आणि पहिल्या महिन्याची सर्व्हिस देखील फ्री असेल. शिवाय, रु. 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला कंपनीकडून 3300GB हाय-स्पीड इंटरनेटचा फायदा मिळेल. बीएसएनएल फायबर बेसिक प्लॅनची किंमत 499 रुपये प्रति महिना आहे, परंतु सध्या, बीएसएनएल ऑफर अंतर्गत, तुम्हाला हा प्लॅन 399 रुपयांना दरमहा मिळेल.
advertisement
हा प्लॅन 60Mbps स्पीड देतो. परंतु डेटा लिमिट पूर्ण झाल्यानंतर, स्पीड 4Mbps पर्यंत कमी केला जाईल. डेटा व्यतिरिक्त, या प्लॅनमध्ये फ्री लँडलाइन कनेक्शन देखील समाविष्ट आहे. ज्यामुळे तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग बेनिफिट मिळू शकतात. हे लक्षात घेण्यासारखे आहे की तुम्हाला स्वतः लँडलाइन खरेदी करावी लागेल. रिलायन्स जिओकडे 399 रुपयांचा प्लॅन देखील आहे. परंतु हा प्लॅन 30Mbps स्पीड देतो. हा प्लॅन 3300GB डेटा आणि कॉलिंग बेनिफिट देखील देतो.
advertisement









