Vaibhav Suryavanshi VIDEO : वैभवची बॅटींगनंतर फिल्डिंगमध्येही कमाल, खरतनाक CATCH घेतली, अख्खं स्टेडिअम पाहत राहिलं

Last Updated:

टीम इंडियाच्या 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने 95 बॉलमध्ये 171 धावांची वादळी खेळी केली होती. या खेळीसोबत वैभव सूर्यवंशीने फिल्डिंगमध्येही जबरदस्त कामगिरी केली आहे. या सामन्यात वैभव सूर्यवंशीने एक जबरदस्त कॅच घेतली आहे.

Vaibhav Suryavanshi
Vaibhav Suryavanshi
Vaibhav Suryavanshi VIDEO : अंडर 19 आशिया कपला सूरूवात झाली आहे.या स्पर्धेत टीम इंडियाच्या 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने 95 बॉलमध्ये 171 धावांची वादळी खेळी केली होती. या खेळीसोबत वैभव सूर्यवंशीने फिल्डिंगमध्येही जबरदस्त कामगिरी केली आहे. या सामन्यात वैभव सूर्यवंशीने एक जबरदस्त कॅच घेतली आहे. या कॅचचा आता व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
खरं तर भारताने दिलेल्या 433 धावांच्या लक्ष्याच्या पाठलाग करताना युएईची सूरूवात खराब झाली होती.कारण भारताच्या बॉलर्सनी युएईचे टॉप आर्डरला झटपट बाद केले होते.त्यानंतर पृथ्वी मधू या खेळाडूने युएईचा डाव सावरला होता. कारण त्याने आपल्या 50 धावा केल्या होत्या. त्यानंतर विहान मल्होत्राच्या बॉलवर पृथ्वीने खूप उंचावर शॉर्ट मारला होता.हा बॉल बाऊंन्ड्री लाईन नजीक पोहोचला होता.यावेळी वैभव सूर्यवंशीने डाईव्ह जबरदस्त कॅच घेतली. ही कॅच खूपच कठीण होती. पण वैभव सूर्यवंशीने ही कॅच पूर्ण करून दाखवली. या कॅचचा आता व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
advertisement
कसा रंगला सामना
अंडर 19 आशिया कप 2025च्या पहिल्याच सामन्यात भारताच्या अ संघाने 50 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 433 धावा केल्या होत्या.त्यामुळे युएई अ संघासमोर 434 धावांचे लक्ष्य होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना युएईची सुरूवात खूपच खराब झाली होती. कारण युएईचे 53 धावांमध्येच 6 विकेट पडले होते. त्यामुळे युएई ऑलआऊट होईल असे वाटत होते. पण या पृथ्वी मधूने 50 धावांची तर उद्दीश सूरीने 78 धावांची नाबाद खेळी केली होती. त्यामुळे युएई 50 ओव्हरमध्ये फक्त 7 विकेट गमावून 199 धावा करू शकली होती. त्यामुळे भारताने हा सामना 234 धावांनी जिंकला आहे.
advertisement
दरम्यान भारताकडून वैभव सूर्यवंशीने 95 बॉलमध्ये 171 धावांची खेळी केली होती. या खेळीत त्याने 14 षटकार आणि 9 चौकार लगावले होते. त्याच्यासोबत अरॉन जॉर्जने 69 धावांची खेळी केली होती. त्यामुळे दोघांमध्ये 212 धावांची पार्टनरशीप झाली होती.त्यामुळे जितक्या धावांची वैभव आणि अरॉन जॉर्जची पार्टनरशीप झाली होती.तितक्याच धावात युएईचा संघ गार झाला आहे. त्यामुळे भारताचे हे दोनच खेळाडू युएई्च्या संघाला पूरून उरले आहेत.
advertisement
दरम्यान भारताने हा सामना जिंकून आशिया कपमध्ये श्रीगणेशा केला आहे. आता भारताचा दुसरा सामना हा पाकिस्तान विरूद्ध असणार आहे. हा सामाना रविवारी 14 डिसेंबर 2025 ला खेळवला जाणार आहे. या सामन्याची उत्सुकता क्रिकेट प्रेमींना लागली आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Vaibhav Suryavanshi VIDEO : वैभवची बॅटींगनंतर फिल्डिंगमध्येही कमाल, खरतनाक CATCH घेतली, अख्खं स्टेडिअम पाहत राहिलं
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement