Iron Deficiency : महिलांमधे लोहाच्या कमतरतेची लक्षणं कशी ओळखायची ? कमतरता भरुन कशी काढायची ?

Last Updated:

लोहाच्या कमतरतेमुळे हिमोग्लोबिन कमी होतं आणि शरीराच्या सर्व भागांना योग्य ऑक्सिजन पोहोचण्यास अडथळा येतो. म्हणूनच, लोहाची कमतरता टाळणं अत्यंत महत्वाचे आहे. जाणून घेऊयात लोहाच्या कमतरतेची लक्षणं.

News18
News18
मुंबई : शरीरात अशक्तपणा जाणवत असेल तर आवश्यक जीवनसत्त्वं, खनिजांचं संतुलन बिघडलेलं असतं.  यात पुरुषांपेक्षा महिलांमधे लोहाची कमतरता जास्त आढळते. त्यामुळे अशक्तपणासारख्या गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. ऑक्सिजन वाहतुकीसाठी जबाबदार असलेल्या हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी लोह आवश्यक आहे.
लोहाच्या कमतरतेमुळे हिमोग्लोबिन कमी होतं आणि शरीराच्या सर्व भागांना योग्य ऑक्सिजन पोहोचण्यास अडथळा येतो. म्हणूनच, लोहाची कमतरता टाळणं अत्यंत महत्वाचे आहे. जाणून घेऊयात लोहाच्या कमतरतेची लक्षणं.
लोहाच्या कमतरतेची लक्षणं कोणती?
थकवा आणि अशक्तपणा ही सर्वात सामान्य लक्षणं आहेत. पुरेशा हिमोग्लोबिनच्या पातळीचा अभाव ऊती आणि स्नायूंना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही, ज्यामुळे उर्जेची पातळी कमी होते.
advertisement
त्वचा पिवळी होणं - हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे त्वचेचा, डोळ्यांच्या आत आणि नखांच्या खालचा रंग फिकट होऊ शकतो.
श्वास घ्यायला त्रास होणं - चालणं, पायऱ्या चढणं किंवा थोडं काम करताना तसंच श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
डोकेदुखी आणि चक्कर येणं: मेंदूला पुरेसा ऑक्सिजन पुरवठा न झाल्यामुळे डोकेदुखी, चक्कर येणं किंवा बेशुद्ध पडणं असं होऊ शकतं.
advertisement
हृदयाचे ठोके जलद होणं - ऑक्सिजनची कमतरता भरून काढण्यासाठी शरीर हृदयाला अधिक काम करण्यास भाग पाडतं.
केस गळणं आणि नखं ठिसूळ होणं - लोहाच्या तीव्र कमतरतेमुळे केस गळू शकतात आणि नखं ठिसूळ किंवा चमच्याच्या आकाराचे होऊ शकतात.
तोंडाच्या कोपऱ्यात भेगा पडणं आणि जीभ सुजणं - ऊतींमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे होते.
रेस्टलेस लेग सिंड्रोम - पायांत अस्वस्थता आणि त्यांना हलवण्याची सतत इच्छा होणं.
advertisement
माती, बर्फ किंवा खडू सारख्या गोष्टी खाण्याची इच्छा होणं.
महिलांमध्ये लोहाच्या कमतरतेची कारणं -
मासिक पाळी - मासिक पाळी दरम्यान महिलांना मासिक रक्तस्त्राव होतो, ज्यामुळे नियमितपणे लोह कमी होतं.
ज्या महिलांना जास्त रक्तस्त्राव होतो त्यांना जास्त धोका असतो.
advertisement
गर्भधारणा: गर्भधारणेदरम्यान, गर्भाला विकासासाठी जास्त लोहाची आवश्यकता असते. म्हणून, योग्य आहार किंवा पूरक आहारांच्या अभावामुळे ही समस्या उद्भवू शकते.
आहाराशी संबंधित : महिला आहाराकडे कमी लक्ष देतात, ज्यामुळे शरीरात लोहाची कमतरता देखील होऊ शकते.
पौष्टिक असंतुलन - व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे लोहाचं शोषण कमी होऊ शकतं, तर जास्त प्रमाणात चहा किंवा कॉफी पिणं यामुळेही अडथळा येऊ शकतो.
advertisement
सेलिआक रोग, अल्सर, मूळव्याध किंवा गॅस्ट्रिक बायपास सर्जरी यासारख्या स्थितीतही लोह शोषणावर परिणाम होऊ शकतो किंवा रक्तस्त्राव होऊ शकतो.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Iron Deficiency : महिलांमधे लोहाच्या कमतरतेची लक्षणं कशी ओळखायची ? कमतरता भरुन कशी काढायची ?
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement