W,W,W,W,W,W,W... T20 क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड, बॉलरने एका मॅचमध्ये घेतल्या इतक्या विकेट!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
क्रिकेटच्या मैदानात सध्या रोजच नवीन विक्रम बनत आहेत. आता टी-20 फॉरमॅटमधल्या एका विक्रमाने क्रिकेट विश्व अवाक झालं आहे.
मुंबई : क्रिकेटच्या मैदानात सध्या रोजच नवीन विक्रम बनत आहेत. आता टी-20 फॉरमॅटमधल्या एका विक्रमाने क्रिकेट विश्व अवाक झालं आहे. 33 वर्षांच्या फास्ट बॉलरने टी-20 क्रिकेटमध्ये 7 विकेट घेतल्या आहेत, ज्यात त्याने एक हॅटट्रिकही घेतली आहे. या स्पेलमुळे विरोधी टीमची बॅटिंग पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली आहे.
बहरीनचा फास्ट बॉलर अली दाऊदने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतिहास घडवला आहे. भूतान आणि बहरीन यांच्यातल्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजमध्ये तिसऱ्या सामन्यात हा ऐतिहासिक पराक्रम घडला आहे. दाऊदने फक्त 19 रनमध्ये 7 विकेट घेतल्या आहेत. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातला हा दुसरा सर्वोत्तम बॉलिंग स्पेल आहे.
पहिले बॅटिंग करणाऱ्या बहरीनने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 160 रन केल्या, यानंतर 161 रनच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भूतानला दाऊदने धक्के दिले. दाऊदने इनिंगच्या तिसऱ्या ओव्हरपासून भूतानचं कंबरडं मोडायला सुरूवात केली आणि दोघांना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. यानंतर त्याने 16व्या ओव्हरमध्ये लागोपाठ 3 विकेट घेऊन हॅट्रिक घेतली. यानंतर पुढच्या ओव्हरमध्ये त्याने आणखी 2 विकेट घेऊन 7 विकेट पूर्ण केल्या.
advertisement
सर्वोत्तम स्पेल कोणता?
अली दाऊदच्या आधी इद्रुसने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असाच पराक्रम केला होता. मलेशियाकडून खेळताना इद्रुसने 8 रनमध्ये 7 विकेट घेतल्या. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम स्पेलचा हा विक्रम अजूनही कायम आहे. दाऊदच्या या कामगिरीमुळे बहरीनने भूतानवर 35 रननी विजय मिळवला आणि सीरिजमध्ये 3-0 ने आघाडी घेतली.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 12, 2025 9:00 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
W,W,W,W,W,W,W... T20 क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड, बॉलरने एका मॅचमध्ये घेतल्या इतक्या विकेट!









